पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
वाखरी पंढरपूर येथील तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत माईर्स एम.आय.टी. जूनियर कॉलेज वाखरीच्या विद्यार्थ्यांचे अभूतपूर्व यश मिळले आहे.
पंढरपूर येथील विठ्ठल प्रशाला, गुरसाळे येथे शैक्षणिक वर्ष 2025-2026 च्या शालेय शिक्षण क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत माईर्स एम.आय.टी. जूनियर कॉलेज वाखरी च्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट प्रदर्शन करत अनेक पदके मिळवली.
या स्पर्धेत पवन तुकाराम देशमुख (इयत्ता 12, कॉमर्स) ने 19 वयोगटातील गोळाफेक स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त केला, तसेच त्याची जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली. त्याचबरोबर धनराज धनंजय भिंगे (इयत्ता 12, कॉमर्स) ने 19 वयोगटात तालुकास्तरीय थाळीफेक स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त केला आणि जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी त्याची निवड झाली.
यासोबतच उदय खरात (इयत्ता 12, कॉमर्स) ह्याने हातोडाफेक स्पर्धेत त्रितीय क्रमांक मिळविला आहे.
यासाठी कॉलेजचे प्राचार्य डॉ. स्वप्नील शेठ, हेडमिस्ट्रेस शिबानी बॅनर्जी , आणि क्रीडा शिक्षक प्रवीण पिसाळ यांचे विशेष योगदान मिळाले.स्पर्धेतील उत्कृष्ट यशासाठी कॉलेज प्रशासनाने विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.