पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
आपले मंडळ मागील अनेक वर्षांपासून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करीत आहे. त्यानिमित्ताने आपल्या मंडळामार्फत समाज प्रबोधनासाठी विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. समाजातील विविध घटकांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी निबंध वक्तृत्व गायन पाठांतर नृत्य नाट्य इ स्पर्धांचे आयोजन करून त्यांनाही प्रोत्साहन दिले जाते. तसेच अनिष्ट रूढीपरंपरा नष्ट होण्यासाठी त्याचे देखावे सादर केले जातात.
अखिल भारतीय ग्राहक पंचायत ही देशपातळीवर नोंदणी असलेली अधिकृत ग्राहक संघटना आहे. मागील ५० वर्षापासून ग्राहक प्रबोधनजागृती समस्या निवारण याबाबत मार्गदर्शन करण्याचे काम करीत आहे. त्यासाठीच्या "ग्राहक संरक्षण कायदा निर्मितीमागे महत्त्वाचे योगदान दिलेले आहे. त्याद्वारे ग्राहक म्हणून आपणास मिळालेले हक्क माहिती होण्यासाठी व सजग नागरिक म्हणून असणारी कर्तव्ये याबाबत माहिती देण्याचे काम करीत आहे.
दैनंदिन जीवनात वस्तू व सेवा घेतांना ग्राहक म्हणून आपली आर्थिक फसवणूक झाली अडवणूक झाली तर तक्रार निवारण करण्यासाठी कोठे जावे याची माहिती सर्वांना असणे आवश्यक आहे. त्याबद्दलचे माहिती फलक लावण्याचा उपक्रम अ. भा. ग्राहक पंचायतीतर्फे सुरू आहे. सामाजिक कार्य म्हणून अशा माहितीचे फलक आपल्या गणेशोत्सव मंडपाशेजारी लावण्यात यावेत.
हे फलक लावुन ग्राहक पंचायतीच्या समाज प्रबोधनाच्या कार्यात आपल्या मंडळाचे सक्रिय सहकार्य मिळावे ही विनंती तसेच माहिती फलक अखिल भारतीय ग्राहक पंचायतीतर्फे दिले जातील.अशी माहिती ग्राहक पंचायत तालुका अध्यक्ष विनय उपाध्ये यांनी दिली आहे.
तसेच संपर्कासाठी दीपक इरकल, शशिकांत हरिदास, महेश भोसले, संतोष उपाध्ये, आझाद अल्लापूरकर, विनोद भरते सुहास निकते नंदकुमार देशपांडे शहाजी जाधव प्रशांत माळवदे यांच्याशी संपर्क साधावा.