पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर येथील सिहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संगणक विभागाच्या विद्यार्थिनी साक्षी संभाजी गवळी (खवासपूर, तालुका सांगोला) यांची पुणे येथील प्रसिद्ध सॉफ्टवेअर कंपनी यार्डी सॉफ्टवेअरमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर पदासाठी निवड करण्यात आली आहे अशी माहिती महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली. साक्षी हिला ५.९४ लाख वार्षिक पॅकेजची ऑफर देण्यात आली आहे.
यार्डी सॉफ्टवेअर ही एक आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत कंपनी आहे जी रिअल इस्टेट व्यवस्थापनासाठी सॉफ्टवेअर आणि तंत्रज्ञान उपाययोजना प्रदान करते. कंपनीने जागतिक बाजारपेठेत आपली वेगळी ओळख निर्माण केली असून, रिअल इस्टेट व्यवस्थापन, लेसिंग, मालमत्ता व्यवस्थापन, आणि आर्थिक व्यवहारासाठी अत्याधुनिक सॉफ्टवेअर सोल्यूशन्स विकसित करते. यार्डी सॉफ्टवेअर पुणे हे कंपनीचे महत्त्वाचे कार्यालय असून, तेथे अनेक युवा तंत्रज्ञ कार्यरत आहेत.
साक्षीच्या यशामागे सिहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ट्रेनिंग व प्लेसमेंट सेलचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. महाविद्यालयाने वेळोवेळी आयोजित केलेल्या कौशल्य विकास कार्यक्रम, इंटर्नशिप्स, आणि प्लेसमेंट ट्रेनिंगमुळे विद्यार्थ्यांना कंपन्यांच्या गरजेनुसार तयार करण्यात मदत झाली आहे. या प्रयत्नांमुळेच साक्षीला यार्डी सॉफ्टवेअरमध्ये निवड होऊ शकली. महाविद्यालयाच्या प्लेसमेंट सेलच्या अथक प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांच्या करिअरमध्ये उत्तम संधी उपलब्ध होत आहेत.
साक्षीच्या या यशाबद्दल महाविद्यालयाच्या संपूर्ण शैक्षणिक व प्रशासकीय मंडळाने हार्दिक अभिनंदन केले आहे. यामुळे पंढरपूर सिंहगड महाविदयालातील विद्यार्थींसाठी मोठा प्रेरणादायी संदेश गेला आहे.
साक्षी हिची कॅम्पस मुलाखतीतून निवड झाल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, डॉ. चेतन पिसे, डॉ. भालचंद्र गोडबोले, डॉ. श्याम कुलकर्णी, डॉ. श्रीगणेश कदम, डॉ. संपत देशमुख, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. अतुल आराध्ये, डॉ. दिपक गानमोटे, डॉ. सोमनाथ कोळी, डॉ. सुभाष पिंगळे, डॉ.अनिल निकम, डॉ. शिवशंकर कोंडूरु, डॉ. यशवंत पवार, डॉ. सत्यवान जगदाळे, प्रा. अभिजित सवासे, प्रा. संदीप लिंगे आदींसह आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.