पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, पंढरपूरमध्ये अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी १ जुलै २०२५ ते १० जुलै २०२५ या कालावधीत एसक्यूएल प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणाचे संचालन श्री. रवी तेजा यांनी केले.
या प्रशिक्षणात विद्यार्थ्यांना डेटाबेस व्यवस्थापन, एसक्यूएल क्वेरी लेखन, डेटा मॅनिप्युलेशन तसेच विविध एसक्यूएल तंत्रज्ञानांचा सखोल अभ्यास करून व्यावसायिक कौशल्ये वाढविण्यावर भर देण्यात आला. या कौशल्यामुळे विद्यार्थ्यांना उद्योगक्षेत्रातील डेटाबेसशी संबंधित कामे अधिक आत्मविश्वासाने व कौशल्याने पार पाडता येतील. एसक्यूएल हे आजच्या डिजिटल युगातील अत्यंत आवश्यक कौशल्य असल्यामुळे या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांना कॅम्पस प्लेसमेंटमध्ये मोठा फायदा होणार आहे. याशिवाय, प्रोग्रामिंग व डेटा अॅनालिसिससारख्या क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या संधीही वाढण्यास मदत होईल.
सिंहगड महाविद्यालयात आयोजित या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांचे व्यावसायिक व तांत्रिक कौशल्य वृद्धिंगत होण्यास महत्त्वाचा हातभार लागला आहे. सोलापूर जिल्हयामध्ये अभियांत्रिकीच्या विदयार्थ्यांसाठी कॉग्नीझंट ही कंपनी कॅम्पस प्लेसमेंटसाठी फक्त सिंहगड महाविदयालयातील विदयार्थ्यांसाठीच ऑगस्ट महिन्यात उपलब्ध झालेली आहे. यासाठी एसक्यूएलचे प्रशिक्षण विदयार्थ्यांना कॅम्पस प्लेसमेंटमध्ये निवड होण्यासाठी उपयुक्त ठरेल अशी आशा महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी केली.
हे प्रशिक्षण यशस्वी होणेसाठी महाविदयालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.