पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
आज दिनांक 22 ऑगस्ट 2025 रोजी पोलीस संकुल पंढरपूर पोलीस स्टेशनच्या समोर आगामी येणाऱ्या गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद यानिमित्त पंढरपूर विभागीय अधिकारी पोलीस स्टेशन पंढरपूर यांच्यावतीने मिटींगचे आयोजन करण्यात आलेले होते.
यावेळी प्रांत अधिकारी सचिन इथापे म्हणाले की गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद साजरी करताना सामाजिक उपक्रम राबवावेत असे गणेश मंडळ व ईद-ए-मिलाद पदाधिकारी यांना आव्हान केले.
तसेच पंढरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे यांनीही गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद साजरे करताना शांततेचा अभंग होणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन केले.
या बैठकीसाठी प्रांताधिकारी सचिन इथापे पोलीस उपविभागीय अधिकारी प्रशांत डगळे तहसीलदार सचिन लंगोटे तसेच पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या प्रभारी रेखा घनवट तालुका पोलीस स्टेशनचे तय्यब मुजावर शहर पोलीस स्टेशनचे विश्वजीत घोडके तसेच करकम पोलीस स्टेशनचे सागर कुंजीर तसेच पीएसआय वीरसेन पाटील तसेच युवा नेते प्रणव परिचारक शेळवे गावचे पोलीस पाटील नवनाथ पाटील धोंडेवाडी चे नितीन देठे पाटील पिराची कुरोलीचे शरद कौलगे पाटील तसेच ग्रामीण भागातील पोलीस पाटील या बैठकीसाठी उपस्थित होते.
तसेच ग्रामीण भागातील गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष पदाधिकारी व व शहर गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष पदाधिकारी व ईद-ए-मिलाचे पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत युवा नेते प्रणव परिचारक यांनीही गणेशोत्सव पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले तसेच प्रशासनाने ही सहकार्य करावे अशी भूमिका मांडली शेळवे पोलीस पाटील नवनाथ पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले शेवटी आभार प्रदर्शन मानून बैठकीचा समारोप करण्यात आला.
भाळवणी येथे आज बैठकीचे आयोजन
आगामी येणाऱ्या गणेशोत्सवानिमित्त भाळवणी गावामध्ये पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या प्रभारी रेखा घनवट या मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत तरी सर्व गणेश मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी तसेच सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांनी ग्रामपंचायत कार्यालय भाळवणी या ठिकाणी संध्याकाळी 06;00 वाजता अवश्य उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.