पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचे वाढदिवसानिमित्त पंढरपूर तालुक्यात वृक्ष लागवड करणे याबाबत पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघाचे विधानसभा सदस्य समाधान दादा आवताडे यांनी दिनांक 13. 8.2025 रोजी पंढरपूर तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालय प्रमुख यांची बैठक तहसील कार्यालय पंढरपूर येथे घेतली.
पंढरपूर तालुक्यातील शासकीय कार्यालयानी स्वयं स्फूर्तीने वृक्ष लागवड करावी तसेच वृक्षांची जोपासना करावी. वृक्ष लागवडी साठी सामाजिक वनिकरण विभाग पंढरपूर यांच्यामार्फत मार्फत रोपे पुरविण्यात येणार आहेत तसेच ट्री गार्डची आवश्यकता भासल्यास सामाजिक संस्था अथवा CSR फंड मधून देण्यात येतील असे सूचित केले व उपक्रमांतर्गत सर्व शासकीय कार्यालयाने पंढरपूर तालुका व शहर परिसरात एकूण 50000 झाडे लावून एक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणे बाबत आमदार समाधान आवताडे यांनी निर्देश दिले.
यानुसार सर्व विभाग प्रमुख यांनी रिकाम्या शासकीय जागा, रस्त्याच्या दुतर्फा, तलाव-ओढा परिसर, इरिगेशेन कॅनॉल पट्टी, शायकीय कार्यालय परिसर इत्यादी ठिकाणी वृक्ष रोपण करण्याचे नियोजन व आश्वासन आमदार समाधान दादा आवताडे यांना दिले.
या बैठकीसाठी सचिन इथापे उपविभागीय अधिकारी पंढरपूर विभाग पंढरपूर व सचिन लंगुटे तहसीलदार पंढरपूर सुशील संसारे गटविकास अधिकारी पंचायत समिती पंढरपूर,श्रीमती पूजा अवताडे तालुका भूमि अभिलेख कार्यालय पंढरपूर, विजय पाटील कार्यकारी अभियंता महावितरण पंढरपूर 1 बी एम मिटकरी उपकार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग पंढरपूर, विशाल माने कार्यकारी अभियंता उजनी कालवा विभाग पंढरपूर श्रीमती शीतल साठे वनपरिक्षेत्र अधिकारी पंढरपूर, टी वाय मुजावर पोलीस निरीक्षक, पंढरपूर तालुका पोलीस ठाणे श्रीमती रेखा घनवट पोलीस निरीक्षक पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाणे, सूर्यकांत मोरे तालुका कृषी अधिकारी पंढरपूर, श्रीमती सुवर्ण हाके प्रशासन अधिकारी नगरपरिषद पंढरपूर, राहुल चव्हाण बाल विकास प्रकल्प अधिकारी पंढरपूर, पि.के डोके उपविभागीय जलसंधारणा अधिकारी जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभाग पंढरपूर, मोरे गटशिक्षण अधिकारी पंढरपूर उपस्थित होते.