पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
‘क्युनोपी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’ या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरींगच्या दोन विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे निवड करण्यात आली आहे.’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) चे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी दिली.
कॉम्प्युटर क्षेत्राशी संबंधीत पुणे येथील ‘क्युनोपी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’ या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीच्या निवड समितीने स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधील विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. त्यांनी या निवड प्रक्रियेच्या अंतिम फेरीतून धनश्री यशवंत बागल व विशाल बंडू गडदे या दोन विद्यार्थ्यांची निवड केली. या नामांकित मल्टीनॅशनल कंपनीत सिलेक्शन झालेल्या दोनही विद्यार्थ्यांचे वार्षिक पॅकेज प्रत्येकी रु. ४.५ लाख इतके आहे. स्वेरी मध्ये नवनवीन आंतरराष्ट्रीय कंपन्या येत असतात आणि त्यातूनच कंपनीसाठी पात्र अशा विद्यार्थ्यांची निवड करत असतात. त्यामुळे विविध आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये येथील विद्यार्थी आपले उत्तम करिअर घडवीत आहेत. सदर विद्यार्थ्यांना ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे अधिष्ठाता प्रा. ए.ए.मोटे, डॉ.एस. एम. खोमणे यांच्यासह विभागातील सर्व प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध झाल्यामुळे विशेषतः पालक वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
संस्थेचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष अशोक भोसले, उपाध्यक्ष सुरेश राऊत, सचिव प्रा. सुरज रोंगे, संस्थेचे इतर पदाधिकारी व विश्वस्त, सर्व संचालक मंडळ, स्वेरी कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम.एम. पवार, उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांच्यासह पालकांनी ‘क्युनोपी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीमध्ये कॅम्पस इंटरव्ह्यूमधून निवड झालेल्या दोन्ही विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.