पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
मंगळवार दि. 26 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास पंढरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील मौजे चिंचोली भोसे या ठिकाणी गोपनीय माहिती मिळाल्याने ,पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी भीमा नदी पात्राच्या कडेला जाऊन छापा मारून ,त्या ठिकाणी अवैधरित्या वाळू चोरी करून जात असलेला टेम्पो ट्रक किंमत 10 लाख आणि त्यामध्ये एकूण दोन ब्रास वाळू किंमत 12 हजार असा एकूण 10 लाख 12000 रुपये किमतीचा मुद्देमाल पंढरपूर तालुका पोलिसांनी आज रोजी जप्त केला.
ट्रक चालक आणि ट्रक मालक यांच्याविरुद्ध बी एन एस कलम 303 .305 अन्वय गुन्हा दाखल केलेला आहे. सदरचा ट्रक व वाळूसाठा पंढरपूर तालुका पोलिसांनी जप्त केलेला आहे
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी , अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली, पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री टी वाय मुजावर, पोलीस उपनिरीक्षक श्री वडणे, पोलीस हवालदार संजय गुटाळ ,विजयकुमारआवटी ,आबा शेंडगे, घंटे , सय्यद यांच्या पथकाने कारवाई केलेली आहे.