पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
१७/०७/२०२५ रोजी गुरुवारी, MIT विश्वप्रयाग विद्यापीठ, सोलापूरचे प्रतिनिधी नीरव शिंदे आणि वैदिक खरे यांनी एम आय टी ज्यू कॉलेज वाखरी च्या इयत्ता १२ वी विज्ञान आणि वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन सेमिनार आयोजित केले होते.
या सेमिनारमध्ये, MIT विश्वप्रयाग विद्यापीठाद्वारे चालवल्या जाणाऱ्या डिझाइनिंग प्रोग्रामबद्दल विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन केले. हा सेमिनार विद्यार्थ्यांसोबत खूपच संवादात्मक होता, त्यांना व्हिडिओ दाखवून आपल्या सभोवतालच्या सजीव आणि निर्जीव वस्तूंना डिझाइन कसे केले जाते.
याचे मार्गदर्शन करण्यात आले. भविष्यात डिझाइनिंग कोर्सला आपल्या देशात आणि जगात खूप मागणी असेल. डिझाइनिंग कोर्समध्ये सर्जनशीलता आणि तांत्रिक कौशल्ये किती महत्त्वाची भूमिका बजावतात हे विद्यार्थ्यांना समजावून सांगितले गेले.
फॅशन, उत्पादन, ग्राफिक आणि इंटिरियर डिझाइनमधील डिझाइनची डिझाइन उद्योगात गरज आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना वास्तविक जगातील उदाहरणे दिली गेली आणि डिझाइनिंग कोर्स त्यांना चांगले भविष्य घडवण्यासाठी कसे मदत करू शकतो हे स्पष्ट केले गेले.
यावेळी हेडमिस्ट्रेस शिबानी बॅनर्जी, प्राचार्य डॉ स्वप्नील शेठ तसेच सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.