कासेगाव प्रतिनिधी तेज न्यूज
शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरच्या औषध निर्माण शास्त्र (फार्मसी) च्या अभ्यास मंडळावर राजारामबापू कॉलेज ऑफ फार्मसी कासेगावचे प्राचार्य डॉ. एस. के. मोहिते यांची नुकतीच निवड करण्यात आली.
अभ्यास मंडळावर नियुक्ती होण्यासाठीचे सर्व निकष उदा. संशोधन प्रबंध लिहिणे व सादर करणे, विद्यार्थ्यांना एम. फार्म व पी.एच.डी. साठी मार्गदर्शन करणे, संशोधनासाठी विविध संस्थांकडून संशोधन अनुदान प्राप्त करणे, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील कार्यशाळेचे आयोजन करणे इ. निकष असतात. ते सर्व निकष डॉ. मोहिते यांनी पूर्ण केल्यामुळे विद्यापीठाचे मा. कुलगुरू, कुलसचिव यांनी त्यांना नियुक्त केले. याबद्दल कासेगाव शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य श्री. आर. डी. सावंत यांनी डॉ. मोहिते यांचा सत्कार केला.
याबद्दल महाविद्यालयाचे सर्व स्तरावर अभिनंदन होत आहे. महाविद्यालयातील प्रा. डॉ. व्ही.आर. साळुंखे हे फार्मसी विभागाच्या अभ्यास मंडळात कार्यरत आहेत.