पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी देवशयनी आषाढी एकादशीच्या दिवशी सिंहगड महाविद्यालय कोर्टी ते पंढरपूर विठू नामाच्या गजरामध्ये, डिजिटल डिटॉक्स चा संदेश देत पायी दिंडी सोहळा उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा केला अशी माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
वर्ल्ड डिजिटल डिटॉक्स डे च्या संकल्पनेवर आधारित झेप फाउंडेशनच्या पुढाकाराने आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. यामध्ये सिंहगड इंजिनिअरिंग काॅलेज मधील सर्व विद्यार्थ्यांनी वारकरी पोशाखामध्ये टाळ मृदुंगाच्या भक्तीमय वातावरणामध्ये पायी पंढरपूरला जात मोबाईल व इंटरनेटचा होत असलेला अतिवापर समाजासाठी व कौटुंबिक स्वास्थ्य बिघडवण्यासाठी कशाप्रकारे घातक ठरू शकतो हे विद्यार्थ्यांनी पथनाट्याच्या माध्यमातून अतिशय प्रखरपणे सादर केले. हे पथनाट्य पाहत असताना उपस्थित वारकऱ्यांनी देखील मुलांचे कौतुक केले.
डिजिटल डिटॉक्स च्या संकल्पनेवर आधारित विविध गवळणी, भारुड, अभंग, ओव्या विद्यार्थ्यांनी सादर केल्या.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी झेप फाउंडेशनच्या संचालिका वैशाली चव्हाण, सिंहगड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, प्रा.चंद्रकांत देशमुख, प्रा. सुमित इंगोले, प्रा. गुरुराज इनामदार, निशा करांडे आदींसह राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी विद्यार्थीनी, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. हा दिंडी सोहळा भक्तीमय वातावरणात संपन्न झाला.

