भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथे श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या पालखीचे मोठ्या उत्साही वातावरणात स्वागत करण्यात आले. यावेळी भाळवणी गावचे सरपंच रणजीत जाधव यांच्या हस्ते अश्वचे पूजन करून वेणेकर व तुळशी यांचे पूजन करण्यात आले.
यावेळी ट्रस्टच्या मान्यवरांचा सत्कार ही गावचे सरपंच रणजीत जाधव यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी प्रवीण शिंदे दाऊद भाई शेख सलीम तांबोळी यांनी मान्यवरांचा सत्कार केला.
तसेच कोले परिवाराच्या वतीने अश्वपूजन व पालखीतील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी अश्वाचे उभे रिंगण घेण्यात आले. यानंतर हा पालखी सोहळा शाकंभरी देवी मंदिरात आल्यानंतर वारकरी भाविकांनी एकच जल्लोष केला तर महिलांनी फुगडी खेळून आनंद व्यक्त केला.

