अकलूज प्रतिनिधी तेज न्यूज
भारतीय संस्कृतीत विविध सण, परंपरा समाजाला एकत्रीत बांधतात. यातूनच एका अनामिक आस्थेने चालत आलेल्या व चांगुलपणावर आधारलेले अनेक सण व परंपरा आपण गेली कित्येक वर्ष जपत आलेलो आहोत.
या परंपरेचे पाईक होत असताना महाशिवरात्र यात्रा महोत्सव समितीच्या संचालिका कु.स्वरूपाराणी मोहिते-पाटील यांचे नेतृत्वाखाली नागपंचमी सण २०२५ आयोजित केला आहे. यामध्ये आपल्या कुटुंबातील मायमाऊली, सौभाग्यवती यांना सहभागी होण्यासाठी आपण प्रयत्न करावेत.
तसेच एकेकाळी गावगाडयात भल्लरीगीत, जात्यावरील ओव्या, शेतकरी गीत, पिंगळा, वासुदेव या गाण्यांनी गावची पहाट सुंदर व्हायची ही सुरावट गाणा-या व पारंपारिकता जपणा-या मायमाऊली आपल्या गावात, परिसरात असतील त्यांनाही या सणासाठी आवर्जून उपस्थित करावे.
वर्षभर रांधा वाढा उष्ठे काढा यामध्ये स्वत:ला गुरफटून घेणाऱ्या मायमाऊलीं साठी हा सोहळा आनंदाची पर्वणी ठरावा यासाठी येथे मनपसंत खाद्य पदार्थ माफक दरात ठेवलेले आहेत.
तरी या नागपंचमी सणास जास्तीत जास्त महिला भगिनी सहभागी होण्यासाठी आपण विशेष प्रयत्न करावेत.
दिनांक: २८ व २९ जुलै २०२५
वेळ : दुपारी ४.०० ते रात्री ८.००
स्थळ : श्री शिवपार्वती मंदिर, शंकरनगर
तरी महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन जयसिंह मोहिते-पाटील उर्फ बाळदादा यांनी केले आहे.