सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
लायन्स इंन्टरनॅशनल अंतर्गत लायन्स क्लब ऑफ सोलापूर सिटीच्या सन २५-२६ साठी अध्यक्षपदी लायन मोहन भुमकर यांची पुनश्च निवड करण्यात आली.
यावेळी सचिव, खजिनदार आणि इतर लायन्स सदस्यांची संचालक मंडळाची निवड करण्यात आली. लायन्स क्लब ऑफ सोलापूर सिटी त्यांनी ३९ वर्षांपासून कार्यरत करत आहेत.सोलापूर जिल्हा तायक्वांदो स्पोर्ट्स कौन्सिलचे गेली बारा वर्षे विध्यामान अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत तसेच विणकर बाग मित्र मंडळ येथे सुध्दा अध्यक्ष म्हणून तसेच गुरूविद्या प्रतिष्ठानचे संस्थापक सल्लागार आहेत.
नेतृत्व कसे करायचे हे मोहन भूमकर यांना शालेय शिक्षण विद्यार्थ्यांच्या व कॉलेज दशेत त्यांनी अगदी लहानपणापासून वर्गात पहली वर्गापासून व कॉलेज सिआर म्हणून काम केले, तसेच १९८० ते १९९० दरम्यान युवक बिरादरीचे सामाजिक संघटनेत कार्य केले. तसेच क्लबच्या वतीने सामाजिक, आरोग्य, शैक्षणिक, क्रीडा, वृक्षारोपण, धार्मिक, अन्नदान, रक्तदान असे विविध क्षेत्रात मोहन भुमकर अग्रेसर असतात. त्यांच्या निवडी बद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.