पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
प्रतिवर्षाप्रमाणे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर यांचे वतीने आयोजित अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आणि कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांचे मार्गदर्शनाखाली आणि सर्व सदस्य व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांचे उपस्थितीत पवित्र आषाढी एकादशी दिवशी श्री विठ्ठल सभा मंडपामध्ये विठूराया चरणी ख्यातनाम गायक अमोल पटवर्धन यांच्या सुश्राव्य गायनाने विठूराया चरणी स्वराभिषेक केला.
यावेळी त्यांनी वारकरी संप्रदायाचा बीजमंत्र जय जय राम कृष्ण हरी,नामघोषाने वातावरण भक्तिमय करत नामाचा गजर,अबीर गुलाल उधळीत रंग,वृंदावनी वेणू, आम्ही विठ्ठलाचे वारकरी,आदी अभंग गात शेवटी कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर भैरवी गात कार्यक्रमाची सांगता केली.त्यांना तितकीच सुंदर निवेदन अभय नलगे यांनी केले तर साथसंगत तबला आदिनाथ कुटे, पखवाज ज्ञानेश्वर दुधाणे हार्मोनियम विलास कुलकर्णी टाळ सचिन सानप यांनी केली.
यावेळी सर्व कलाकारांचा सन्मान व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांचे शुभहस्ते करण्यात आला.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व कर्मचारी यांनी अधिक परिश्रम घेतले.