मुंबई प्रतिनिधी गणेश हिरवे तेज न्यूज
महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या वतीने पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना अध्यक्ष, आमदार ज. मो. अभ्यंकर यांच्या संकल्पनेतून प्रेरणा मास 27 जून ते 27 जुलै वृक्ष लागवड व संगोपन या उपक्रमाअंतर्गत 12 जुलै शनिवार रोजी अभिनव विद्या मंदिर, बोरीवली (पूर्व), मुंबई येथे महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना अध्यक्ष, आमदार ज. मो. अभ्यंकर यांचे शाळेच्या विद्यार्थ्यांनी लेझीम ढोल पथकाने स्वागत केले. पारंपारिक सांस्कृतिक पद्धतीने विद्यार्थ्यांनी साहेबांचे औक्षण केले.
स्वागतानंतर सन्माननीय आमदार अध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना ज मो अभ्यंकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. सदर शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती प्राची वालकर, सचिव अमीन ठाकूर तसेच सर्व शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी वर्ग यांच्या हस्ते ही वृक्षारोपण करण्यात आले. अभ्यंकर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना वृक्ष संवर्धनाची जबाबदारी घेण्याचे आवाहन केले.श्री. रामचंद्र गावडे, तेजस्वी निवाते आणि मंदाकिनी आवटे. यांच्या नियोजनाने कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.