भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
भाळवणी (ता. पंढरपूर) येथील न्यू इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स विद्यालयात इ .5 वी आणि 8 वी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी व पालक यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.
इ .५ वी मधील ९८ विद्यार्थ्यांपैकी कु.समृद्धी सोनवणे २५६ गुण आणि राधेश माने २३८ गुण मिळवून शिष्यवृत्तीधारक ठरले. तसेच इयत्ता ८ वी मधील कु . श्रेया हातगिने २३८गुण , कु.साक्षी शिंदे २२२ गुण , कु . साक्षी ऐवळे २२२ गुण , विराज म्हेत्रे २२२ गुण कु. वैष्णवी माळी २१६ गुण , पार्थ जाधव १९४ गुण, कु.सिमरन शेख १९४ गुण , सिद्धार्थ सरतापे १८४ गुण मिळवून शिष्यवृत्तीधारक झाल्याबद्दल समारंभा प्रसंगी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी व पालक, मार्गदर्शक शिक्षक यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
याप्रसंगी स्थानिक स्कूल कमिटीचे चेअरमन संभाजी राजे शिंदे,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य भगवानराव चौगुले, वामन पाटील, प्राचार्य के.डी. शिंदे, उपसरपंच नितीन शिंदे, उपप्राचार्या पी.बी. मोरे, पर्यवेक्षक जी.पी. बेसीकराव आदी उपस्थित होते. संस्थेच्या वतीने यशस्वी विद्यार्थी व विद्यालयाचे अभिनंदन करण्यात आले.