पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरी संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागाच्या अंतिम वर्षात नुकतेच अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केलेल्या गणेश राजाराम कचरे यांची एम.टेक. च्या उच्च शिक्षणासाठी आय.आय.टी., बॉम्बे येथे निवड झाली आहे तसेच त्यांची भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर मध्ये देखील शास्त्रज्ञ म्हणून निवड झाली आहे.
गेट अर्थात ‘ग्रॅज्युएट अप्टीट्यूड टेस्ट इन इंजिनिअरिंग’ या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेची तयारी ‘स्वेरी’ मध्ये इंजिनिअरिंगच्या दुसर्या वर्षापासूनच नियमितपणे करून घेतली जाते. विद्यार्थ्यांना या संदर्भात पहिल्या वर्षापासून माहिती दिली जाते तसेच या परीक्षेच्या माध्यमातून मिळणाऱ्या वेगवेगळ्या संधी जसे आय.आय.टी., एन.आय.टी. सारख्या कॉलेजमध्ये एम.टेक. साठी निवड, पब्लिक सेक्टर अंतर्गत असलेल्या वेगवेगळ्या सरकारी कंपन्यांमध्ये निवड आणि इतर संधी बाबत नियमितपणे माहिती दिली जाते व त्यासंदर्भात तयारी करून घेतली जाते. याचाच फायदा घेत गणेश कचरे यांनी इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षात असताना ‘गेट’ परीक्षा दिली व त्यामध्ये भारतातून ३९वा क्रमांक मिळवला तसेच त्यांनी शेवटच्या वर्षी देखील परीक्षा दिली आणि उत्तम यश मिळवले. या माध्यमातून त्यांना विविध नामांकित आय.आय.टी. मध्ये उच्च शिक्षणासाठी बोलविण्यात आले. त्यामधून त्यांना आय.आय.टी., बॉम्बे या देशातील नावाजलेल्या संस्थेमध्ये एम.टेक. साठी प्रवेश मिळाला. याचबरोबर त्यांनी भारत सरकारच्या ‘भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर’साठी देखील मुलाखत दिली. या प्रक्रियेतून त्यांची या देशपातळीवरील आणि जगविख्यात संस्थेमध्येही निवड झाली.
या दोन्ही अप्रतिम संधीच्या माध्यमातून गणेश कचरे यांचे एम.टेक. अर्थात उच्च शिक्षण ‘भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर’ च्या माध्यमातून स्पॉन्सर केले जाणार आहे. त्याचबरोबर एम.टेक. संपताच त्यांना या संस्थेबरोबर शास्त्रज्ञ म्हणून काम करण्याची संधी देखील मिळणार आहे. गणेश कचरे यांची कॅम्पस निवड प्रक्रियेमधून नामांकित कंपनीमध्ये देखील निवड झालेली होती. स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी विविध कंपन्यांना लागणाऱ्या तयारी बरोबरच इतर संधीची देखील तयारी करून घेतली जाते. ज्यामध्ये गेट, गव्हर्मेंट एक्झाम, कॅट अशा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध परीक्षांचा समावेश आहे. याचबरोबर विद्यार्थ्यांची अॅप्टीटयूड, सॉफ्ट स्किल, कम्युनिकेशन, ग्रुप डिस्कशन आणि मुलाखत प्रक्रियेसाठी तयारी करून घेतली जाते. या माध्यमातून विद्यार्थ्यांना अशा प्रकारच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील करिअरच्या संधी उपलब्ध होत आहेत.
गणेश कचरे यांची आय.आय.टी., बॉम्बे मध्ये निवड झाल्यामुळे संस्थेचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष अशोक भोसले, उपाध्यक्ष सुरेश राऊत, सचिव प्रा. सुरज रोंगे, संस्थेचे इतर पदाधिकारी व विश्वस्त, सर्व संचालक मंडळ, स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम.एम.पवार, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर तीनही महाविद्यालयाचे प्राचार्य, इंजिनिअरिंग च्या उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व पालकांनी गणेश कचरे यांचे अभिनंदन केले आहे.