मुंबई प्रतिनिधी भारत कवितके तेज न्यूज
रविवार दिनांक २७ जुलै २०२५ रोजी सकाळी ११वाजता जोगेश्वरी पूर्व जुनी अस्मिता शाळा , श्री कृष्ण नगर, श्री कृष्ण मंदिर शेजारी ,मनपा ट्रामा रुग्णालय बांदेकर वाडी येथे प्रथम मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले, स्वागत गीत गाऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली, प्रमुख पाहुण्यांचा परिचय सत्कार सोहळा पार पडला.
यावेळी प्रमुख पाहुणे पाठ्यपुस्तकातील ग्रामीण कवी श्री राम घडे यांनी सांगितले की,माझी पहिली कविता साप्ताहिक आम्ही मुंबईकर मध्ये छापून आली तेव्हा पासून मी कविता लिहीत गेलो, संपादक प्रमोद सूर्यवंशी यांचा मी यामुळे आभारी आहे," सागर देशमुख सरांनी आपण चित्रपटांमध्ये लहान बालकांना घेऊन त्यांना प्रोत्साहन देऊ शकतो," साप्ताहिक आम्ही मुंबईकर च्या उपसंपादिका वसुधा नाईक म्हणाल्या की " रमाची पाटी या चित्रपटाचे मी लेखन केले त्यास १०० हून अधिक पुरस्कार मिळाले, शिक्षिका असल्याने मी बालगीता मधून मुलांचे मनोरंजन केले आहे कोरोना काळात आई वडील गेले अशा मुलांना मदत करते,२८ मुलांना दिपावलीच्या सणात कपडे दिले,पण मी प्रत्यक्ष आर्थिक मदत करीत नाही,कारण ती गरजू पर्यंत पोहचत नाही,मी कोणतीही नवीन संधी सोडत नाही . संपादक प्रमोद सूर्यवंशी यांच्या बरोबर साप्ताहिक आम्ही मुंबईकर चे लावलेले रोपटे वटवृक्ष झाल्याचे समाधान आहे," संपादक प्रमोद सूर्यवंशी यांनी सांगितले की" साहित्यिक मित्रांमुळेच आम्ही आम्ही मुंबईकर साप्ताहिक काढू शकलो, साहित्यिकांना वाव मिळावा म्हणून.प्रचंड प्रतिसाद मिळत गेला, मागणी व नोंदणी वाढत गेली, आठवड्यातून दोनदा अंक काढावा लागतो आहे, आता दैनिक व्हावा अशी मागणी होत आहे.
"या कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ साहित्यिक व अभिनेते अजय बिरारी मार्गदर्शन करताना म्हणाले की " तुम्ही पुरस्कारापर्यत पोहचला म्हणजे तुम्ही तुमची कला आत्मसात केली आहे, कलाकार मला आपलासा वाटतो म्हणून मी त्यांच्यात जातो, व्हाट्सअप, फेसबुक वर दिलेली दाद खरी असतेच असे नाही, माझ्या साहित्याचा प्रवास थोडा उशीरच चालू झाला." या वेळी रज्जाक शेख यांनी अप्रतिम गजल गाऊन रसिकांची मने जिंकली, काही कवी कवयित्री यांना कविता सादर करण्याचा मोह आवरता आला नाही, सांस्कृतिक व साहित्य रत्न पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात जल्लोषात संपन्न झाला,या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.सुचित्रा कुंचमवार व श्री शैल सुतार यांनी खुमखुमीत मनोरंजनात्मक अभ्यास पूर्ण केले.शेवटी गौरव पुंडे यांनी आभार मानले.
या प्रसंगी भारत कवितके, संजय पाटील,हिंगणकर महाराज, मो . अ.रहीम , सुरेखा पाटील, नमाई सुभाष नाईक, जयराम मांजरे - पाटील , सुरक्षा पाटील, जयश्री बोरसे, गीतांजली वाणी, आशा ब्राह्मणे, किशोरी पाटील, योगिता कोठेकर योगिता जाधव, संजय डुबल, गणेश हिरवे ,लक्ष्मण शिवणेकर, मारुती नलावडे बाळासाहेब तोरसकर , सविता जगताप, संतोष यादव, रज्जाक शेख व इतर पुरुष व महिला पुरस्कार्थी उपस्थित होते, सर्वांनी संपादक प्रमोद सूर्यवंशी,उपसंपादक वसुधा नाईक,ग्राफिक्स डिझाईनर अंगद दराडे यांचे आभार मानले.
आयोजक , गौरव पुंडे,योगेश हरणे, महेश सोनवणे, रेखा हरियाण यांनी उत्तम सहकार्य केले.खास आकर्षण ठरली कार्यक्रमात आज ज्यू चार्ली ( सोमनाथ स्वभावाने ), राजश्री देशमुख ( कोस्ट्युम डिझायनर, स्वरा कदम ( बाल कलाकार )यांच्या आगमनामुळे आणखी कार्यक्रमाची शोभा वाढली.