सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
लायन्स क्लब ऑफ सोलापूर सेंट्रल व हरीभाई देवकरण प्रशालेची 1961 ची 11 वी ची बॅच यांच्या संयुक्त विद्यमाने लायन्स गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा गुरुवार दिनांक 10 जुलै 2025 रोजी प्रमुख वक्ते प्रा.अशोकदास, डिस्ट्रिक्ट गव्हर्नर-1 ला.राजेंद्र शहा कासवा, पुरस्कार निवड समितीचे समन्वयक माजी प्रांतपाल डॉ.गुलाबचंद शहा यांच्या उपस्थितीत,लायन्स क्लब अध्यक्ष ला.प्रा.स्वामीनाथ कलशेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली ला.रिजन चेअरमन ॲड.ला.श्रीनिवास कटकुर, ला.केदार स्वन्ने,आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले
कार्यक्रमाची सुरुवात ला.प्रा स्वामीनाथ कलशेट्टी यांनी घंटा नादाने केली.सचिव ला.दीनानाथ धुळम यांच्या ध्वजवंदनानंतर,उपस्थित प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते प्रतिमापूजन,दीप प्रज्वलन करण्यात आले. उपस्थित पाहुणे लायन राजेंद्र शहा,लायन मल्लिनाथ पाटील प्रमुख वक्ते प्रा.राजेंद्र दास व सत्कारमूर्तीं इत्यादी मान्यवरांचा अध्यक्ष प्रा.स्वामीनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आले.
प्रमुख वक्ते प्रा. अशोक दास सरांचा परिचय ला. चंद्रकांत यादव यांनी केले. पुरस्कार मूर्ती वालचंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष कोटी यांचां परिचय कोषाध्यक्ष ला.सी ए श्रेणिक शहा यांनी करून दिले. माजी प्रांतपाल ला.डॉ. गुलाबचंद शहा यांनी,हरीभाई देवकरण प्रशालेतील एक आदर्श शिक्षक के पी मंगळवेढेकर सरांचा अध्यापन व कार्य शैलीची माहिती देत 1961 ची इयत्ता 11वी बॅच मधील विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुऋणतून मुक्त होण्यासाठी विशिष्ट रक्कम जमा करून त्याच्या व्याजातून दरवर्षी स्व. के पी मंगळवेढेकर यांच्या नावाने पुरस्कार देण्यास सुरुवात करण्यात आले अशी माहिती आपल्या प्रास्ताविकेतून विषद केले.तदनंतर पुरस्कार मूर्ती प्राचार्य संतोष कोटी सरांचा सन्मानाचिन्ह,शाल,पुष्पहार पुष्पगुच्छ व अकरा हजार रुपयांचा चेक देऊन सपत्नीक यथोचित सन्मान करण्यात आला.नंतर पुरस्कार मूर्ती प्राचार्य डॉ.संतोष कोटी सरांनी, गुरुपौर्णिमेनिमित्त गुरूंविषयी, आपल्या संस्थेविषयी,व लायन्स क्लब ऑफ सोलापूर सेंट्रल विविध उपक्रमाविषयीची माहिती आपल्या मनोगतातून व्यक्त केले.सदर पुरस्कार सन्मान माझा नसून माझ्या गुरूंचा,संस्थेचा,आणि माझ्या संस्थेतील सर्वच कर्मचारी वृंदांचा आहे असे सांगितले. व्हॉइस डिस्ट्रिक्ट गव्हर्नर-1ला.राजेंद्र शहा याने लायन्स क्लबच्या या उपक्रमाविषयी याविषयी कौतुक केले.
प्रमुख वक्ते प्रा अशोक दास सर म्हणाले की,गुरूंच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी लायन्स क्लब सेंट्रल कडून के.पी मंगळवेढेकर गुरूंच्या नावाने पुरस्कार दिला जातो आणि तेही गुरुपौर्णिमेच्या दिवशी ही एका शिक्षकाच्या जीवनातील भाग्याची गोष्ट व सन्मान आहे या पुढे असे म्हणाले सोलापूर शहरातील महाविद्यालयात काहीआदर्श आदर्श गुरू व आदर्श शिष्य निर्माण झालेले आहेत,त्यापैकी मीही एक आहे असा उल्लेख केला.अध्यक्षपदावरून बोलताना लायन प्रा.स्वामीनाथ कलशेट्टी म्हणाले की,'"आदर्श गुरु हा विद्यार्थ्यांच्या जीवनातील मनातील अज्ञानाचा अंधार दूर करून त्यांच्या जीवनाला योग्य आकार वळण देण्याचं महान कार्य करतो,विद्यार्थ्यांचा जीवनाचा शिल्पकारच हा गुरु असतो. असे एक सोलापुरातील आदर्श संस्थेतील प्राचार्य डॉ.संतोष कोटी सर आहेत,देवत्व दाखवण्याचा मार्ग गुरुमुळेच शक्य होते.म्हणून भारतीय संस्कृतीत गुरुचं स्थान अनन्यसाधारण आहे असेही म्हणाले.
सदर कार्यक्रमाचे यशस्वी सूत्रसंचालन माजी प्रांतपाल ला.अरविंद कोणसिरसगी व लायन गिरीधारीलाल मेहता यांनी केले. कार्यक्रमाची सांगता दिव्या रच्चा यांच्या पसायदानाने करण्यात आले.
या कार्यक्रमाचे आभार सचिव ला. दीनानाथ धुळम यांनी मानले. हा कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लायन्स क्लब चे सर्व पदाधिकारी सदस्यगण आदींचे बहुमोल सहकार्य लाभले.