वाडी कुरोली प्रतिनिधी तेज न्यूज
वाडीकुरोली ता. पंढरपूर येथे पेरूच्या उत्पादनामध्ये प्लास्टिक बॅग व नेट फोमचा वापर अत्यंत उपयुक्त ठरतो. प्लास्टिक बॅग फळांना कीटकांपासून, विशेषतः फळमाशीपासून संरक्षण देते. यामुळे फळांचा रंग, चव व गुणवत्ता सुधारते आणि कीटकनाशकांचा वापर कमी होतो. पावसापासून फळांचे संरक्षण होते व बुरशीजन्य रोगांपासून बचाव होतो. यामुळे स्वच्छ, रोगमुक्त आणि आकर्षक फळे मिळतात.
दुसरीकडे, नेट फोमचा वापर फळांची वाहतूक करताना किंवा साठवणुकीदरम्यान त्यांचे संरक्षण करण्यासाठी केला जातो. हे फळांना एकमेकांवर आपटण्यापासून व फोडण्यापासून वाचवते, ज्यामुळे फळांचा दर्जा टिकून राहतो. यामुळे बाजारात फळांना अधिक मागणी व चांगला दर मिळतो. अशा प्रकारे प्लास्टिक बॅग आणि नेट फोमचा वापर करून शेतकरी आपली उत्पादन क्षमता आणि नफा दोन्ही वाढवू शकतात.
अकलूज येथील शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संग्राम सिंह मोहिते पाटील रत्नाई कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य . आर जी. नलवडे,प्रा. एस.एम.एकतपुरे कार्यक्रम समन्वयक अधिकारी प्रा. एम एम चंदनकर कार्यक्रम अधिकारी एच व्ही कल्याणी व विषयतज्ज्ञ प्रा. एस. एस .भोसले यांच्या मार्गदर्शनानुसार कृषिकन्या श्रुती पाटोळे भोईटे योगिता, जगदाळे सानिका , शिखरे प्रतीक्षा ,कहाकर साक्षी ,रेड्डी रोहिणी,देशमुख प्रणोती ,घुले तनुजा , वैशाली खिलारे यांनी ठिबक सिंचनाचे महत्त्व पटवून दिले.