कडेगांव प्रतिनिधी तेज न्यूज
सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यात असलेल्या उपाळे मायणी या गावात, जिथे आजही आपल्या समाजाचे एकही घर नाही, तेथे गेल्या दोन पिढ्यांपासून अखंडपणे संत नामदेव महाराजांच्या समाधी सोहळ्या निमित्त हरिनाम सप्ताह अत्यंत भक्तिभावाने साजरा केला जात आहे. ही परंपरा म्हणजे भक्ती, निष्ठा आणि सामाजिक समरसतेचे एक आदर्श उदाहरण ठरत आहे.
या अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने संत नामदेव महाराज राष्ट्रीय एकात्मता विश्व महासंमेलन आयोजन समितीचे सदस्य श्री. संतोष मुळे, महेश पंतगे, योगेश बकरे, महादेव पंतगे आणि श्रीनिवास आंबेकर यांनी सदिच्छा भेट देत, या ऐतिहासिक भक्तिपर्वाला मानवंदना अर्पण केली. त्यांच्या भेटीने स्थानिक भाविकांत उत्साहाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले.
हा सप्ताह म्हणजे संत नामदेव महाराजांच्या कार्याची आणि वारशाची जिवंत प्रेरणा आहे. एकही घर नसतानाही समाजाने इथे सातत्याने दिलेल्या सेवाभावाला, श्रद्धेला आणि अध्यात्मिक योगदानाला सलाम करत, राष्ट्रीय स्तरावर त्याचा गौरव करण्यात आला आहे.
चलो नागपूर…..चलो नागपूर….
राष्ट्रीय एकात्मतेसाठी….संत नामदेव महाराजांच्या विचारांसाठी…..