आटपाडी प्रतिनिधी तेज न्यूज
व्यंकटेशतात्या माडगूळकरांच्या सिध्दहस्त लेखणीने उपेक्षित, वंचित, मागास, पराकोटीच्या गरीब बनगरवाडीला जगविख्यात केले . नरेंद्रजी - देवेंद्रजी !, तुमच्या नेतृत्वाखालच्या देश भारत - राज्य महाराष्ट्र - जिल्हा सांगली - तालुका आटपाडीतल्या " शेंडगेवाडीला ", पोपटराव पवार यांच्या हिवरे बाजार पेक्षाही अति अत्याधुनिक " देवेंद्राची वाडी " बनवा. अशी आर्जवी प्रार्थना सादिक खाटीक यांनी शासनकर्त्यांना केली आहे .
चार दशके पत्रकारीता आणि समाजकार्यात सतत व्यस्त राहीलेल्या, आटपाडी तालुक्याचा सच्चा साथी - सेवक सिद्ध झालेल्या सादिक खाटीक यांनी, आटपाडी तालुक्याच्या असंख्य प्रश्नांवर सातत्याने आवाज उठविण्याचे काम केले आहे . ११ जुलैपासून आटपाडी येथे सुरू असलेल्या शेंडगेवाडीकरांच्या आंदोलनाला आज बिनशर्त पाठींबा देवून शेंडगेवाडीला देशातले सर्वोत्तम आदर्श गाव बनवविण्याची मागणी केली . राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार ओबीसी विभागाचे प्रदेशचे उपाध्यक्ष, कुरेश कॉन्फरन्सचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, शेतकरी साहित्य इर्जिक परिषदचे उपाध्यक्ष असलेल्या सादिक खाटीक हे शेंडगेवाडीकरांच्या व्यथा वेदनांनी अत्यंत व्याकुळ, हळवे झाले . अनेक वेळा शेंडगेवाडीकरांच्या आंदोलनाला समर्थन देण्याची, व्यथा वेदनांना सर्वदूर पोहचवण्याची भूमिका यापूर्वी आपण वेळोवेळी पार पाडली आहे . असे स्पष्ट करून सादिक खाटीक यांनी, शासन व्यवस्थेने केलेल्या दुर्लक्षा बद्दल त्यांनी खेद व्यक्त केला . एक टर्म पासून चार चार टर्म आमदार राहीलेल्या आणि अनेक वेळा नामदार, आमदार, खासदार राहीलेल्या मातब्बरांच्या कडून दुर्लक्षित राहीलेल्या शेंडगेवाडीला आता तरी तातडीने न्याय दिला जावा अशी सादिक खाटीक यांनी अपेक्षा व्यक्त केली .
बनपुरी, कामथ पासून ५ किमी, खरसुंडी पासून १० किमी आणि आटपाडी पासून १८ किलोमीटर अंतरावरील शेंडगेवाडी या धनगर समाजाच्या वाडीला स्वातंत्र्यपुर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातील शे - दीडशे वर्षापासून अनंत अडचणी, समस्या, संकटांना तोंड द्यावे लागले आहे . परंतू या गावच्या मेंढपाळांचा आवाज कोणत्याही राज्यकर्त्यांपर्यत, शासन व्यवस्थेपर्यत पोहचला असे अजिबात वाटत नाही . स्वातंत्र्यापूर्वी पासून १८ किमीवरील आटपाडी ग्रामपंचायतीचा भाग असलेल्या शेंडगेवाडीला कोणत्याही नेत्याने पुरेपूर न्याय दिल्याचे आज अखेर दिसून आले नाही .
जन्म मृत्यू च्या दाखल्यापासून, शेता शिवाराच्या नोंदीपर्यंत, इतर कोणत्याही शासकीय सोपस्करासाठी, विद्यालयीन , महाविद्यालयीन शिक्षणासाठी, बाळंतपण, इतर आजारांच्या अथवा अचानक उद्भवणाऱ्या अनेक आजारांच्या औषधोपचार, अथवा तंटे बखेड्यांसाठी प्रत्येक शेंडगेवाडीकराला ३६ किमी अंतराच्या येरझाऱ्या घालाव्याच लागत . ऊन, वादळ, वारा, वीज, पाऊस, जंगली श्वापदे, सरपटणारे विषारी जीव, या सारख्या अनेक अडथळ्यांचा सामना करीत प्रत्येक शेंडगेवाडीकर, बनपुरी पर्यंत चालतच, हो, हो ! अक्षरश चालतच, खाच खळग्यांच्या, चिखल पाण्याच्या, रस्त्याने जात असे - येत असे . रस्ता द्या , स्वतंत्र गाव द्या, आरोग्यासाठी उपकेंद्र द्या, स्मशानभुमीचे पक्के शेड द्या, मेंढ्यासाठी प्रशस्त आच्छादीत कोंडवाडे द्या, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा, वाहतुकीसाठी एस . टी . सुरू करा . एखाद्या सर्वसंपन्न गावाला लागणाऱ्या सर्व सोयी सुविधा द्या, अशा मागण्या करीत प्रारंभीच्या काही पिढ्या काळाच्या पडद्याआड गेल्या . स्वातंत्र्यानंतरच्या पीढीनेही पंचाहत्तरी पार केली आहे . ज्या तरुणाने आपल्या आंदोलनाने राज्य दणाणून सोडले तो तरूण आज पन्नाशीच्या पुढे वाटचाल करतो आहे . मात्र या शेंडगेवाडीच्या अनेक पिढ्यांचा दुवाँ घेण्याचा कोणीच प्रयत्न केला नाही, हे शेंडगेवाडीसह आटपाडी तालुक्याचे मोठे दुर्दैव आहे .
शेंडगेवाडीतले, शेंडगे आडनाव धारण करणाऱ्यांचा मोठा इतिहास आहे . माजी आमदार, बॅरिस्टर टी . के . शेंडगे ( पेड, तासगांव ), माजी राज्यमंत्री शिवाजीराव शेंडगे बापू, माजी आमदार प्रकाश शेंडगे माजी आमदार रमेश शेंडगे ( केरेवाडी, कवठेमहंकाळ ' ) या सारख्यां दिग्गजांनी भुषविलेल्या आडनावाच्या पंक्तीत शेंडगेवाडीकर बसतात . तथापी या सर्व जणांची भावकी किंवा मुळ एकच असल्याचे बोलले जाते . तथापि १९६२ साली झालेली जि . प . ची ४ थी पर्यतची शाळाच एवढीच दिखावू प्रगती सोडली तर फारसे काही यांच्या हाती लागले नाही . गावचा विकास व्हावा मुलभुत सोयी सुविधा साकाराव्यात म्हणून २००० साली जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहन करण्याचा प्रयत्न करणारे कैलास शेंडगे आज पन्नाशीचे झाले आहेत . गाव स्वतंत्र व्हावे . आदर्श गाव बनावे . ग्रामपंचायत अस्तित्वात यावी , शेंडगेवाडीच्या नावाने महसुली दप्तर तयार व्हावे . २०२२ च्या दरम्यान आटपाडी ग्रामपंचायती पासून वेगळ्या झालेल्या शेंडगेवाडीत जन्मलेल्या आणि मेलेल्यांच्या न झालेल्या नोंदी तातडीने नुतन शेंडगेवाडी ग्रामपंचायतीच्या दप्तरी व्हाव्यात .
मूलभूत सुविधा, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या गेल्या पाहिजेत . तसेच, सामाजिक समानता आणि शाश्वत विकासा वरही लक्ष दिले गेले पाहिजे . गावचा समग्र विकास करताना पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, आर्थिक संधींमध्ये सुधारणा केल्या पाहीजेत . जाती आधारित भेदभावाशिवाय, सर्व नागरिकांना समान संधी, न्याय मिळवून दिला गेला पाहिजे . नैसर्गिक संसाधनांचे जतन करण्याबरोबरच शाश्वत विकास सुनिश्चित केला जाणे महत्वाचे आहे .
गावकरी या विकास प्रक्रियेत सक्रिय सहभागी व्हावेत यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत . पिण्याच्या पाण्याची सोय, रस्ते, वीज, स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन.
शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरण.
शेती, लघुउद्योग, इतर व्यवसाय संधी उपलब्ध करून देण्याबरोबरच. ग्रामपंचायत, स्वयंसेवी संस्था, सरकारी यंत्रणा यांच्या मदतीने आदर्श गाव योजना राबविली गेली पाहीजे . हिवरे बाजार या गावाने पाणी व्यवस्थापन, शेती, पर्यावरण संवर्धनात चांगले काम केले आहे. ग्रामीण भागाच्या विकासासाठी आदर्श गाव योजना एक महत्त्वाची योजना सिध्द होते आहे. या योजनेमुळे, गावांमध्ये मूलभूत सुविधा, सामाजिक समानता आणि शाश्वत विकास साधता येत असल्याने शेंडगेवाडीला याच आदर्श गाव योजनेची अत्यंत आवश्यकता आहे .
पोपटराव पवार यांचे हिवरे बाजार शेंडगेवाडीत अवतरावे अशी अपेक्षा आहेच . तथापि पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या स्वप्नातले आदर्श दत्तक गाव शेंडगेवाडी व्हावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसांनी शे - दीडशे वर्षापासून शेंडगेवाडीकरांनी सोसलेल्या व्यथा, वेदना, समस्या, अनंत अडचणींवरील मात्रा म्हणून राज्यातल्या सर्वात दुर्लक्षित, शेवटच्या टोकाच्या शेंडगेवाडीला राज्यातल्या सर्वात पुढच्या आदर्श गावात गणले जावे इतक्या सक्षम, चौफेर आणि सर्वांगीण प्रचंड विकासासाठी तातडीने ५० कोटी रुपये मंजुर करून देवून पोपटराव पवार यांच्या देखरेखी खाली शेंडगेवाडी अर्थात देवेंद्रनगरी जगभर नावाजली जावी यासाठी तातडीने पावले टाकावीत . हीच आटपाडी तालुका, माणदेश वाशीयांची आणि देशभरातल्या कष्टकऱ्यांची अपेक्षा राहणार आहे . अशा भावनाही सादिक खाटीक यांनी शेवटी व्यक्त केल्या .