भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत रत्नाई कृषी महाविद्यालय अकलूज येथील कृषीदूत धनेश कणमुसे, आकाश पाटील, दयानंद बिदरी, आनंद जमादार, प्रशांत जाधव, विनायक कोटगी, किरण माळी, करण लोखंडे यांनी पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील शेतकऱ्यांना शून्य ऊर्जा शीतकक्षाचे प्रात्यक्षिक करून दाखवले.
या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी प्रतिनिधी शेतकऱ्याच्या शेतात शून्य ऊर्जा शीतकक्ष बनवून दाखवले व शेतकऱ्यांना कमी खर्चात आपले उत्पादन म्हणजेच भाजीपाला व फळे कसे जास्तीत जास्त दिवस टिकवता येईल हे समजावून सांगितले. हे शीत कक्ष कोणत्याही प्रकारचे इंधन वापरत नसल्याने हे शेतकऱ्यांना अतिशय लाभदायक व फायदेशीर आहे. यात पाण्याचे बाष्पीभवन या तत्वावर काम करते. हे पर्यावरणाला देखील हानी करत नाही.
या कार्यक्रमाला शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज चे अध्यक्ष मा.श्री. संग्राम सिंह मोहिते पाटील, प्राचार्य आर जी नलावडे, कार्यक्रम समन्वयक प्रा. एस. एम. एकतपुरे, कार्यक्रम अधिकारी प्रा. एम. एम. चंदनकर व प्रा. व विषय तज्ञ एच. व्ही. कल्याणी यांचे मार्गदर्शन लाभले.
शेतकऱ्यांचा देखील कार्यक्रमासाठी चांगला प्रतिसाद मिळाला व कार्यक्रम चांगल्या रित्या पार पडले.