तांदुळवाडी प्रतिनिधी तेज न्यूज
कृषी महाविद्यालय अकलूज येथील कृषी मित्रांनी शेतकऱ्यांना जनावरांच्या स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत रत्नाई कृषी महाविद्यालय, अकलूज यांच्या अंतर्गत ग्रामीण कार्यानुभव उपक्रमाद्वारे कृषी मित्रांनी शेतकऱ्यांना जनावरांच्या गोठ्याच्या स्वच्छते बद्दल मार्गदर्शन केले. अस्वच्छ गोठा त्यांच्या जनावरांच्या आरोग्यावर होणारा परिणाम त्याचा दुधावर होणारा परिणाम याबद्दल शेतकऱ्यांना कृषी मित्रांनी मार्गदर्शन केले. जनावरे आजारी कशामुळे पडतात त्याचे कारण पण सांगितले.विनाकारण अस्वच्छतेमुळे जनावरांच्या आरोग्यावर होणारा खर्च टाळता येऊ शकतो स्वच्छ गोठा ,स्वच्छ गुरे यामुळे दूध उत्पादन खर्च कमी होऊन. पशुपालन फायद्याचे ठरते. अशी माहिती कृषी मित्रांनी शेतकऱ्यांना सांगितली.
या कार्यक्रमासाठी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संग्राम सिंह मोहिते पाटील ,रत्नाई कृषी महाविद्यालयाचे अकलूज प्राचार्य .आर .जी . नलावडे ,प्रा. एस. एम. एकतपुरे ,प्रा. एम .एम. चंदनकर,विषय तज्ञ प्रा.डी.एस.मेटकरी यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी कृषीदूत अविराज पवार, श्रीधर मारकड, सुयश बागल, संदेश मोरे, अनिकेत चव्हाण, महेश गंगथडे, प्रथमेश चव्हाण, विवेक थोरात यांनी शेतकऱ्यांना जनावरांच्या स्वच्छतेचे महत्व पटवून दिले .