पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
आषाढी वारीच्या सोहळ्यामध्ये प्रमुख मानल्या जाणाऱ्या वाखरी येथील पालखीतळावर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छता मोहिमेमध्ये सहभाग घेत आपले कर्तव्य पार पाडल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के जे करांडे सर यांनी दिली
पंढरपूरला येणाऱ्या सर्व पालख्या या वाखरीच्या पालखी तळावरती येत असतात, येणाऱ्या वारकऱ्यांची राहण्यासाठी व स्वच्छतेच्या दृष्टीने गैरसोय होऊ नये या उद्देशाने सोलापूर विद्यापीठाच्या माध्यमातून राष्ट्रीय सेवा योजनेच्या सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी पंढरपूर येथील विद्यार्थ्यांनी देखील या स्वच्छता मोहिमेमध्ये उस्फूर्तपणे सहभाग घेतला. त्याचबरोबर स्वच्छता व आरोग्य विषयक विविध घोषणांच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश वारकऱ्यांपर्यंत पोहोचवला.
या स्वच्छता मोहिमेस पुण्यश्लोक आहिल्यादेवी सोलापूर विद्यापीठ सोलापूरच्या विभागीय समन्वयक डॉ. संजय मुजमुले यांनीही भेट दिली आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून पुढील सामाजिक उपक्रमाच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या वाखरी पालखीतळ स्वच्छता अभियानासाठी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख डॉ. चंद्रकांत देशमुख, प्रा. गुरुराज इनामदार, प्रा सिद्धेश्वर गनगोंडा, राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.