पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे तसेच श्री संत नामदेव महाराज पायरीचे दर्शन घेतले.
यावेळी मंदिर समितीच्या वतीने मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी उपमुख्यमंत्री श्री शिंदे यांचा शाल व श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देवून सत्कार करण्यात आला.
यावेळी सर्वश्री आमदार समाधान आवताडे, अभिजीत पाटील, उत्तम जानकर, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, मंदिर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगांवकर, तहसीलदार सचिन लंगुटे,मुख्याधिकारी महेश रोकडे, महाराज मंडळी तसेच मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.