मुंबई प्रतिनिधी गणेश हिरवे तेज न्यूज
जोगेश्वरी पूर्व मुंबई येथील श्री समर्थ विद्यालय संचालित श्रीमती लक्ष्मीबाई वळंजू प्राथमिक शाळेत नागपंचमी चा सण मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते गणेश हिरवे यांच्या हस्ते द्वीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.प्राथमिक च्या विद्यार्थ्यांनी गजानन तळेकर, नितीन मंडलिक आणि पूर्व प्राथमिकच्या प्रमुख प्रियंका नारकर यांच्या मार्गदर्शनाखाली एका वर्ग खोलीत नागपंचमी सणाची तयारी करीत कागदावर काढलेली नागाची चित्र, वारूळ, मातीचा नाग आदींनी ती खोली सजवली होती.लाह्या दूध फुलं वाहून उपस्थित विधार्थी शिक्षक आणि मान्यवरांनी नागदेवतेची पूजा केली.तळेकर आणि अतिथी गणेश हिरवे यांनी विद्यार्थ्याना नागपंचमी का साजरी करतात तसेच भारतीय संस्कृतीत सण उत्सव यांचे महत्व तसेच ते का केले जातात याचे महत्व ओळख सांगितली.
या शाळेत येणारी बहुतांश मुलं ही आरे कॉलनी येथील आदिवासी पाड्यातुन येणारी आहेत आणि अभ्यासात व खेळात हुशार आहेत असे प्राथमिकच्या मुख्याध्यापिका सुनीता निंबाळकर यावेळी म्हणाल्या.