जैनवाडी प्रतिनिधी तेज न्यूज
जैनवाडी ( ता .पंढरपूर) येथे राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाशी संलग्नित अकलूजमधील रत्नाई कृषी महाविद्यालाच्या कृषी दूत कडून शेतकऱ्यांना मोबाईल अॅपची माहिती दिली.
कृषी दूत यशराज दळवे ,आमित जगदाळे ,प्रथमेश करे, प्रशिक साबळे,सुयशसाखरे, सोनू वाडे, संकल्प शिराळकर, ऋषिकेश गिराम, ज्योतीराम ढवळे फुले अमृत काळ या मोबाईल प बद्दल शेतकऱ्यांना माहिती दिली. कृषी नेटवर्क अॅप महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी शेतकऱ्यांना जनावरांबद्दल माहिती मिळावी म्हणजेच दुधाचे बाजार भाव, जनावरांना किती चारा द्यावा, जनावरांचे आजार, जनावरांची काळजी कशी घ्यावी त्याचबरोबर क्लीन मिल्क प्रोडक्शन कसे करावे याबद्दलही कृषी दूत शेतकऱ्यांना माहिती दिली.
या कार्यक्रमासाठी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. संग्राम सिंह मोहिते पाटील प्राचार्य. आर .जी नलवडे प्रा .एस .एम एकातपुरे (कार्यक्रम समन्वयक )प्रा .एम एम चंदनकर( कार्यक्रम अधिकारी) तसेच विषय तज्ञ प्रा. एस. व्ही तरंगे यांचे मार्गदर्शन लाभले.