पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनियरींग, कोर्टी, पंढरपूर येथे चालू शैक्षणिक वर्षापासून आर्टिफीशीयल इंटिलिजियन्स व डाटा सायन्स या अत्याधूनिक शाखेचा प्रारंभ शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून प्रारंभ होत आहे.
या अभ्यासक्रमास अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद (एआयसीटीई), नवी दिल्ली संस्थेची अधिकृत मान्यता प्राप्त झाली असून प्रथम वर्षात प्रवेश घेऊ इच्छिणा-या विदयार्थ्यांसाठी मार्गदर्शक कक्ष सुरु केल्याची माहिती महाविदयालयाचे प्राचार्य व कॅम्पस डायरेक्टर डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
ग्रामीण भागातील एक नामांकित महाविदयालय म्हणून पंढरपूर सिंहगडकडे पाहिले जाते. उत्कृष्ठ प्लेसमेंटसाठी महाविदयालयाने अल्पावधीत नावलौकिक मिळविला असून चालू शैक्षणिक वर्षात नवीन अभियांत्रिकी शाखेचा प्रारंभ महाविदयालयाने केला असून, अभियांत्रिकीसाठी इच्छूक असणा-या विदयार्थ्यांसाठी अभ्यासक्रम, नौकरीच्या संधी, प्रवेशप्रक्रीया इत्यादि बाबत मार्गदर्शन केले जाते.
याबाबत डॉ. कैलाश करांडे म्हणाले की, आर्टिफीशीयल इंटिलिजियन्स व डाटा सायन्स ही तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वाधिक मागणी असलेली शाखा असून भविष्यात प्रचंड प्रमाणात नौकरीच्या संधी या शाखेत उपलब्ध होणार आहे. तरी विदयार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी केली.