पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील संगणक विभागातील, तुरोरी, ता.उस्मानाबाद येथील रुतीका संजय माणिकवार हिची कनका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये निवड झाली असून तीला ५ लाखाचे पॅकेज मिळाले असून ती दिनांक १ जानेवारी २०२५ रोजी कंपनीमध्ये रुजू झाल्या असल्याची माहिती संगणक विभाग प्रमुख डॉ.सुभाष पिंगळे यांनी दिली.
कनका सॉफ्टवेअर ही कंपनी ही बहूराष्ट्रीय कंपनी आहे. कनका सॉफ्टवेअर कन्सलटींग प्रा. लि. हि कंपनी २००९ मध्ये पुणे स्थापन झाली. हि कंपनी संगणक ऑपरेटिंग सिस्टीम, सिस्टीम हार्डवेअर, ॲप्लीकेशन सॉफ्टवेअर इ. क्षेत्रात सेवा प्रदान करते.
सिंहगड महाविदयालयाने चालू शैक्षणिक वर्षात अंतिम वर्षात शिकत असणा-या विदयार्थ्यांसाठी २५३ पेक्षा जास्त नामांकित बहूराष्ट्रीय कंपन्यामध्ये नोकरीची संधी उपलब्ध करुन दिलेली आहे. महाविदयालयाचा भर विदयार्थ्यांमध्ये कंपनीला आवश्यक असलेले कौशल्य आत्मसात करण्यावर असतो. यासाठी एल.सी.डी. प्रेझेंटेशन, वक्तृत्व स्पर्धा, समूह चर्चा, रिझ्यूम कॉम्पीटिशन, र्व्हच्यूअल कॅम्पस, कोडींग कॉम्पीटिशन, मॉक इंटरइव्हयू इ. उपक्रम स्टुडंट असोसिएशनद्वारे घेतले जातात. यामुळे विदयार्थ्यांना मोठया प्रमाणात नामांकित कंपनीमध्ये नौकरी मिळत आहे.
रुतीका माणिकवार हिचे कॅम्पस मुलाखतीतून निवड झाल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, डॉ. चेतन पिसे, डॉ. भालचंद्र गोडबोले, डॉ. श्याम कुलकर्णी, डॉ. श्रीगणेश कदम, डॉ. संपत देशमुख, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. अतुल आराध्ये, डॉ. दिपक गानमोटे, डॉ. सोमनाथ कोळी, डॉ. सुभाष पिंगळे, डॉ.अनिल निकम, डॉ. शिवशंकर कोंडूरु, डॉ. यशवंत पवार, डॉ. सत्यवान जगदाळे, प्रा. अभिजित सवासे, प्रा. संदीप लिंगे आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.