पुणे प्रतिनिधी तेज न्यूज
संत नामदेव महाराज राष्ट्रीय एकात्मता विश्व महासम्मेलन आयोजन समितीच्या अंतर्गत विश्व महासम्मेलन मार्गदर्शिका उषाताई पोरे व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मीनल ताई कुडाळकर यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक २८/७/२०२५ रोजी जुजेरी,भोर जिल्हा पुणे येथे आढवा बैठक संपन्न झाली.
संत नामदेव महाराज राष्ट्रीय एकात्मता विश्व महासंमेलनाचा प्रचार आणि प्रसार करणे,संत नामदेव महाराजांच्या कार्याची पताका उंचावण्याचे कार्य आणि राष्ट्रीय एकात्मतेच्या विश्व महासंमेलनाचा जागर प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचे, प्रत्येक घरापर्यंत विश्व महासम्मेलन व नामदेव महाराज कार्यया विषयावर ही आढावा बैठक संपन्न झाली.या सभेस प्रामुख्याने आयोजन समितीच्या संयोजिका उषाताई पोरे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मीनल ताई कुडाळकर तसेच पश्चिम महाराष्ट्र मुख्य संघटक संतोष मुळे तसेच ुणे विभागीय महिला अध्यक्ष सौ. संगीता ताई नाझरे व्यासपीठावर आरुड होते.जुजेरी व भोर शहरचे समाज बांधव व माता भगिनी या कार्यक्रमाला उपस्थित होते.मान्यवरांना श्रीफळ व पुष्प देऊन स्वागत केले.
या कार्यक्रमाच्या औचित्याने प्रदीप सुपेकर,महेश कुडाळकर यांना संत नामदेव महाराज राष्ट्रीय एकात्मता विश्व महासम्मेलन या पदावर नियुक्ती पत्र सर्टिफिकेट देण्यात आले, त्यांचा गौरव करण्यात आला, तसेच श्री संत नामदेव महिला मंडळ भोर,जुजेरी या महिला मंडळ स्थापना करण्यात आली.
विश्व संमेलनाचे ध्येय धोरणे व उद्देश उषाताई पोरे,मीनल ताई कुडाळकर, संगीताताई नाझरे, संतोष मुळे यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमाची सांगता नामदेव महाराजांच्या पसायदानाने झाली.