सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
चिमुकल्यां वारकऱ्यांची वारी ही भक्तीची शाळा,टाळ मृदंगांची साथ नूतन मराठी विद्यालय, डफरीन चौक सोलापूर वारकऱ्यांच्या व बालगोपाळांच्या संगतीत निघाली विठुरायाची वारी सोहळा आयोजित करण्यात आला होता.
यावेळी प्रशालेत महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठ्ठल रुक्मिणीची आषाढी एकादशी निमित्त शालेय चिमुकल्या मुलांची वारकरी दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सेंट्रल लायन्स क्लब अध्यक्ष प्रा. स्वामीनाथ कलशेट्टी उपस्थित होते. प्रशालाचे मुख्याध्यापिका श्रीमती वर्षा जेधे यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचे स्वागत शाल, बुके व पुस्तिका देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वारीचे प्रमुख आकर्षण असलेल्या बालगोपाळांच्या रूपातील "विठ्ठल रुक्मिणी" यांचे पूजन आणि आरती संपन्न झाली.
यावेळी प्रमुख अतिथी लायन प्रा.स्वामीनाथ कलशेट्टी, मुख्याध्यापिका, शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी माऊलीची पालखी खांद्यावर घेत प्रशालेच्या मैदानात वारीला प्रारंभ झाला.त्यानंतर *विद्यार्थ्यांनी " विठ्ल नामाची शाळा भरली","ज्ञानोबा माऊली " ही भक्तीगीते सादर केली. "माऊली माऊली" गीतावर सुंदर असे टाळ नृत्य पारंपारिक महाराष्ट्रीय पेहरावात पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यानीं सादर करत* उपस्थितीची वाहवा मिळवली. या प्रसंगी प्रशालेच्या चिमुकल्या वारकऱ्यांचे गीत,नृत्य सादरीकरण हॆ देखील उपस्थितांचे आकर्षण ठरले.या कार्यक्रमासाठी ज्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला ते सर्वच डोक्यावर तुळस, गळ्यात टाळ आणि वारकऱ्यांच्या पोशाखात उपस्थित होते. प्रशालेच्या मुख्याध्यापिका व प्रमुख अतिथी ही गळ्यात टाळ घालून वारीत सामील झाले. चिमुकल्या वारकरी मुले आपल्या विविध भक्ती गीतांचे सादरीकरण करत, पालकांकडून कौतुकाची शाबासकी मिळवत प्रशालेच्या मैदानावर संपन्न झाले.
याप्रसंगी प्रमुख अतिथी अध्यक्ष लायन प्रा. स्वामीनाथ कलशेट्टी यांनी श्रीविठ्ठल रुक्मिणीची, आषाढी एकादशीची, विविध संतांची महती आपल्या मार्गदर्शनातून उपस्थितांसमोर मांडले.या संपूर्ण वारीचे नियोजन नू म वि प्रशालेच्या मुख्याध्यपिका श्रीमती वर्षा जेधे यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक विभाग प्रमुख सर्वच शिक्षकवृंदानी केले.यावेळी लायन्स क्लब ऑफ सोलापूर सेंट्रलचे पदाधिकारी ही उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता विठ्ठल रुक्मिणीच्या महाआरतीने करण्यात आले.