पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
देशातील व राज्यातील कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासाठी देशातील अकरा प्रमुख संघटनेच्या वतीने देशव्यापी व राज्यव्यापी आंदोलन करण्यात येत आहे राज्य सरकारी कर्मचारी व निम सरकारी कर्मचारी शिक्षक आज संपावर गेले आहेत.
या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्र राज्य नगर परिषद नगरपंचायत कर्मचारी व संवर्ग कर्मचारी संघर्ष समिती व समन्वय समितीच्या वतीने व पंढरपूर नगरपरिषद कामगार संघटनेच्या इंटक च्या वतीने राज्याचे जनरल सेक्रेटरी अँड सुनिल वाळूजकर यांचे नेतृत्वाखाली कामगार संघटनेचे अध्यक्ष महादेव आदापुरे, कार्याध्यक्ष नानासाहेब वाघमारे, उपाध्यक्ष जयंत पवार संतोष सर्वगोड धनजी वाघमारे, नागनाथ तोडकर, संजय वायदंडे,गणेश साठे पदाधिकाऱ्यांच्या समवेत पंढरपूर नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी रवींद्र सूर्यवंशी यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले व देशव्यापी संपास पाठिंबा व राज्यव्यापी आंदोलनास पाठिंबा देण्यात आला तसेच पंढरपूर नगरपरिषद कर्मचारी व सफाई कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या बाबत चर्चा करणे कामी वेळ मिळावी म्हणून निवेदन देण्यात आले.
यावेळी कामगार संघटनेचे पदाधिकारी दर्शन वेळापुरे, पराग डोंगरे, ऋषी अधटराव,गणेश साठे, अनिल अभंगराव, गणेश धारूरकर, केतन बुध्याळ, उमेश कोटगिरी, अविनाश ईश्वरकट्टी हे उपस्थित होते