सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
गुरूविद्या प्रतिष्ठान वतीने सातलिंग शटगार यांचा पुनःछ अध्यक्षपदी निवड करण्यात आले तसेच मुख्याध्यापक म्हणून सेवानिवृत्ती बद्दल हॉटेल मंत्रालय येथे सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. मान्यवरांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात झाली.
यावेळी प्रतिष्ठानचे संस्थापक सोमशेखर भोगडे, उप्पाध्यक्षा राजश्री तडकासे, सचिवा श्रीदेवी यळमेली, जेष्ठ सदस्य विजयकुमार भोगडे यांच्या शुभहस्ते सातलिंग शटगार यांचा सन्मान करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. सातलिंग शटगार शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, धार्मिक क्षेत्रात अग्रेसर आहेत. त्यांनी आजवर अनेक असे गरीब, होतकरू लोकांना मदत केले.
यावेळी डॉक्टर मंगेश शहा, चंद्रकांत सपळे, गणेश अवधूत, योगेश कोरे, चपळगाव चे माजी मुख्याध्यापक शिवबाळ मुली, गणेश अवधूत यांची उपस्थिती होती.शेवटी आभार सचिवा श्रीदेवी यळमेली यांनी केले.