सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
जन्म नक्षत्रानुसार आराध्यवृक्षाची आराधना केल्यानें माणसाचा स्वभाव, आजारपणं आणि आयुष्यातील एकुणच घडामोडींवरील दुष्प्रभाव नष्ट होऊन अनुकुल प्रभाव वाढुन ती फलदायी होते,त्यांचे कर्मक्षेत्र समजु शकते त्यामुळे मनुष्याच्या जीवनात अमुलाग्र बदल होऊ शकतात असे प्रतिपादन परसबाग सोलापूरचे ज्येष्ठ बागकर्मी आणि भविष्य अभ्यासक श्री.चंद्रकांत कोडगीरवार यांनी केले.
श्री. कोडगीरवार यांनी आपल्या घराच्या परसबागेमध्ये नक्षत्र वन तयार केले आहे.त्याच्या माहिती, निरीक्षण आणि अभ्यासासाठी परसबाग सोलापूर या व्यासपीठाच्यावतीनें अभ्यास बाग भेटीचे आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी माहिती देताना ते बोलत होते.परसबाग सोलापूरचे संस्थापक श्री.नारायण पाटील यांनी श्री.कोडगीरवार आणि परसबागचे सहभागी अभ्यासक सदस्यांचे स्वागत करुन या अभ्यास बागभेटीचा हेतु विषद केला.
यासंदर्भात पुढे माहिती देताना ते म्हणाले की,भारतीय पंचांग शास्त्रानुसार अवकाशात ९ ग्रह ,१२ राशी आणि २७ नक्षत्रे आहेत.ज्योतिष शास्त्राची भविष्य गणना त्यावरच आधारित आहे. एका राशीत सव्वा दोन नक्षत्रं आणि एका नक्षत्रात ४ चरण-घटिका असतात.प्रत्येक नक्षत्र अध्यात्म आणि झाडाच्या औषधी मुद्यांशी निगडीत असते.आपल्या जन्म नक्षत्रानुसार आराध्य आराध्यवृक्ष समजतो.तो देवता समान असतो.त्या त्या जन्म नक्षत्रवाल्या व्यक्तींनी आराध्य वृक्ष औषधांसाठी सुध्दा तोडु नये असा संकेत आहे.आराध्यवृक्षाच्या आराधनेनें प्रतिकार शक्ती वाढते,भविष्यातील प्रकृती दोषांची शक्यता जाणुन घेता येते,कर्मदोष दुर होतात.यावेळी त्यांनी प्रत्येक नक्षत्र वृक्षाजवळ जाऊन सविस्तर माहिती देत वृक्षाचे अध्यात्मिक आणि औषधी महत्त्व सांगितले.परसबाग सोलापूर या व्यासपीठानें या विषयावर *अभ्यास बाग भेटीचे* आयोजन केल्याबद्दल आणि आवर्जून सहभाग घेतल्याबद्दल श्री.नारायण पाटील आणि अभ्यासक सदस्यांचे कौतुक करत श्री.कोडगीरवार यांनी त्यांच्या प्रति आदरभाव व्यक्त केला.बागभेटीतील सर्वांचे नक्षत्र वृक्ष कोणते आहेत ते सांगितले.श्री.शिरीष गोळवलकर यांनी आभार प्रदर्शन केले.
या अभ्यास बागभेटीमध्ये परसबागच्या सदस्या सौ.अंजली इंगळे, सौ.सुनिता धायफुले,सौ.सुनिता सोनवणे,सौ.जयश्री हुच्चे, श्री.ज्ञानेश्वर कोंगे,सौ.जयश्री तासगावकर,संस्थापिका सौ.शुभदा पाटील, श्री.शिरीष गोळवलकर,सौ.गौरी गोळवलकर सौ.स्मिता देशपांडे,प्रा.रेवती कुलकर्णी,प्रा.निर्मलप्रसाद कुलकर्णी,सौ.वैशाली कुलकर्णी,सौ.इंदिरा भोस,श्री.अवधुत मोहोळकर,श्रीमती चंदा साखरानी,श्री.विजय साखरानी,सौ.मनिषा शहा सौ.सुनेत्रा मोहोळकर,गोशाळेचे श्री.मनमोहन बरेंगल,श्री.संजय पोल इत्यादींनी आपला सहभाग घेतला.