पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पालखी मार्गावरील ग्रामपंचायतींना वारकरी भाविकांना चांगल्या प्रकारे सोयी सुविधा पुरविण्यासाठी राज्य शासनाकडून जास्तीत जास्त निधी मंजुर करणेत यावा अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचेकडे सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांनी केली आहे.
आषाढी एकादशी निमित्त महाराष्ट्र राज्यातून विविध संतांच्या पालख्या पंढरी नगरीत येत असतात.पालखी मार्गावर तोंडले, बोंडले, दसुर, केसकरवाडी, भाळवणी,पिराची कुरोली, वाडीकुरोली, धोंडेवाडी, उपरी, भंडीशेगांव, शेळवे, खेडभाळवणी, वाखरी, गादेगांव या ग्रामपंचायती आहेत.
सदर गावात श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज, जगदगुरु श्रीसंत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचा विसावा असतो व लहान मोठे अनेक विविध संतांच्या पालख्या गावात मुक्कामी असतात. सदर ग्रामपंयाती यांना वारकरी भक्तांना सोयी सुविध पुरविण्यासाठी ग्रामपंचायतीला मिळणारा राज्य शासनाचा निधी अपुरा पडत असल्याने वारकरी भाविक भक्तांची गैरसोय निर्माण होत असते. वारकरी भाविकांना चांगल्या प्रकारे सोयी सुविधा पुरविण्यासाठी सदर ग्रामपंचायतींना राज्य शासनाकडून जास्तीत जास्त निधी मंजुर होणे गरजेचे आहे अशीही मागणी राज्याचे मुख्यमंत्री यांचेकडे काळे यांनी केली आहे.