पंढरपूर प्रतिनिधी नंदकुमार देशपांडे तेज न्यूज
सोलापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोलापूर अंतर्गत लोक अभिरक्षक कार्यालय येथे दि. 15 जुलै 2025 रोजी एक 80 वर्षीय वृद्ध रा. वेडर पूल लष्कर हे स्वतः आजारी असून त्यांची चारही मूलं दिव्यांग असल्याचे सांगितले व त्यापैकी एक मुलावर दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल होवून न्यायालयात हजर होण्यासाठी समन्स बजावणी झाल्याने ,मोफत विधी सेवेची मागणी करण्यात आली होती . जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे दिव्यांग परिवारास निवासस्थानी मोफत विधी सेवा देण्यात आली.
सदर वृद्ध व्यक्ती शारिरीकदृष्ट्या अत्यंत कमकुवत तसेच आधारा शिवाय चालू शकत नसल्याने व मूलगा दिव्यांग असल्याने लोक अभिरक्षक कार्यालयात येवून मोफत विधी सेवेचा अर्ज भरून देण्यास असमर्थ होते. या सर्व परिस्थितीचे गांभीर्य अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज एस. शर्मा सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली LSUM समितीच्या माध्यमातून लोक अभिरक्षक अॅड. स्नेहल राऊत यांनी त्वरीत विधी स्वयंसेवक श्रीमती विमला गुळेद व श्रीमती हुसेनवी खरादी यांच्या मार्फत सदर वृद्ध व्यक्तीच्या प्रकृतीची विचारणा करून सदर विधी स्वंयसेवेकांच्या सहाय्याने त्यांच्या निवासस्थानी सुरक्षित पोहचवून मोफत विधी सहाय्य देण्याकरिता दिव्यांग मुलाचे अर्ज व वकील पत्र भरून घेतले तसेच दिव्यांगाबाबतचे कागदपत्र घेवून जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोलापूर यांच्याकडे सादर केले.
या प्रकरणात त्वरीत मुख्य लोक अभिरक्षक अॅड. स्नेहल राऊत यांनी आरोपीस व्यक्तीशः हजर न राहता विधीज्ञांमार्फत हजर राहण्याची कायदेशीर तरतूदीचे मार्गदर्शन करून सदर प्रकरण हे सहाय्यक लोक अभिरक्षक. सिद्धाराम म्हेत्रे यांना सोपविले व सदर मोफत विधी सेवा लाभार्थीस जामीनावर मुक्त करून दिव्यांगास गुणवत्तापूर्ण मोफत सेवा दिली अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोलापूर यांच्या कडून देण्यात आली.