संत नामदेव महाराजांची कर्मभूमी श्रीक्षेत्र घुमान पंजाब येथे
संत नामदेव महाराज 675 व्या संजीवन समाधी सोहळ्याचे श्री नामदेव दरबार कमिटीच्या सदस्यांना निमंत्रण
पंजाब प्रतिनिधी तेज न्यूज
वारकरी संप्रदायाचे आद्य प्रचारक व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक ज्यांनी पंढरपूर ते पंजाबच्या श्री घुमान पर्यंत भागवत धर्माचा पताका नेऊन सर्व समाजाला व राष्ट्राला एकत्र जोडण्याची महान कार्य केले होते.
अशा संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या कर्मभूमी घुमान येथे आज दिनांक 16 जुलै मंगळवार रोजी रोजी एक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष महेश ढवळे यांच्या मार्गदर्शनाने प्रत्यक्ष संत नामदेव क्षत्रिय एक संघाचे राष्ट्रीय संघटक मनोज भांडारकर प्रदेशाध्यक्ष एकसंघ अध्यक्ष प्रमोद शिंपी यांनी प्रधान तरसेम सिंग बावा ,संरक्षक अर्जिंदर सिंग बाबा, मुख्य सचिव सुखविंदर सिंग बाबा, उपसचिव मंजिलदर सिंग बाबा, संयुक्त सचिव सरबजीत सिंग बाबा, व सदस्य सुधीर सिंग बाबा यांना कार्यक्रमाचे निमंत्रण दिले तसेच यानंतर दुपारी अमृतसर येथे शीख धर्माचे तीर्थक्षेत्र असलेले श्री शिरोमणी गुरुद्वारा साहेब अमृतसर येथे गुरुद्वारा कमिटीचे SDO सतवीर सिंग यांना सुद्धा अमृतसर येथे जाऊन पंढरपूरच्या कार्यक्रमाचे निमंत्रण पत्रिका दिली.
संत नामदेव महाराजांचे त्यांच्या जीवनातील 20 वर्ष घुमान या ठिकाणी त्यांनी भजन कीर्तनाच्या माध्यमातून भागवत धर्माचा व राष्ट्रीय एकात्मतेचा प्रचार केला होता अशा थोर संत शिरोमणी नामदेव महाराजांची पंजाब मध्ये संत नामदेवांचे लाखो भक्त गण असून या भक्तगणांना आज निमंत्रण पत्रिका देऊन तिथल्या कमिटीच्या सदस्यांनी पंढरपूर येथे दिनांक २३ व २४ जुलै रोजी संजीवन समाधी सोहळ्याला पंढरपूर येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहण्यासाठी सुद्धा आवाहन केले असे संघटक मनोज भांडारकर यांनी सांगितले आहे.