मुंबई प्रतिनिधी उदय वाघवणकर तेज न्यूज
मुंबई सांताक्रुज हनुमान टेकडी येथील रहिवाशी ज्येष्ठ नागरिक लक्ष्मण गोपाल हेमंत वय 66 वर्षे हे मणक्याच्या आजाराने बरेच महिने त्रस्त होते.त्यांच्या पाठीच्या मणक्याची शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे ३ लाख इतका खर्च हॉस्पिटलने सांगितला.पैसे नसल्या कारणाने ते शस्त्रक्रिया करू शकत नव्हते.
महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना मुंबई कार्यालयात रितेश गोसावी यांना संपर्क केले असता ज्येष्ठ नागरिक लक्ष्मण हेमंत यांच्या ३ लाख रुपये इतक्या खर्चाची पाठीच्या मणक्याची शस्त्रक्रिया अंधेरी मधील नामांकित होली स्पिरिट हॉस्पिटल येथे संपूर्णपणे मोफत मध्ये करून दिल्याबद्दल रुग्णाच्या नातेवाईकांनी महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना व रितेश गोसावी यांचे आभार मानले आहेत.