सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
लायन्स इंन्टरनॅशनल अंतर्गत लायन्स क्लब ऑफ सोलापूर सिटीचा पदग्रहण सोहळा थाटात संपन्न झाला.
सुरुवातीस लायन मोहन भुमकर यांनी घंटानाद केले. व्यासपीठावर प्रांताचे एम जे एफ लायन एम.के पाटील ( मल्टिपल व्हाईस चेअरमन), रिजन चेअरमन एम जे एफ लायन श्रीनिवास कटकुर, झोन चेअरमन लायन मल्लिकार्जुन मसुती, जेष्ठ लायन माजी अध्यक्ष गोविंदजी लाहोटी माजी अध्यक्ष लायन गंगाप्रसाद बंडेवार उपस्थित होते सचिवांचा अहवाल सचिव यांनी सादर केले, लायन राजेंद्र शालगर, लायन चन्नबसु माळगे, सचिव राहुल भुमकर याची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. ध्वजवंदन लायन राहुल भुमकर यांनी केले. सर्व मान्यवरांचे अध्यक्ष लायन मोहन भुमकर यांनी स्वागत करुन सत्कार केले. सचिवांचा अहवाल लायन राहुल भुमकर यांनी सादर केले. पदग्रहण अधिकारी एम जे एफ लायन मल्लीनाथ पाटील, यांनी नुतन अयक्ष , सचिव, खजिनदार आणि सर्व लायन सदस्याना गोपनीयतेची शपथ देण्यात आले.
पुढील कार्यास शुभेच्छा देऊन क्लबचे कौतुक केले. डिस्ट्रिक्ट प्रांतपाल एम जे एफ लायन डॉ विरेंद्र चिखले, उपप्रांतपाल लायन राजेंद्र भाई शहा कासवा,माजी प्रांतपाल गण, डिस्ट्रिक्टचे रिजन १, झोन ५ झोन चेअरमन लायन सोमशेखर भोगडे या सर्वाचा शुभसंदेश वाचुन दाखवण्यात आला.रिजन चेअरमन एम जे एफ लायन श्रीनिवास कटकुर, झोन चेअरमन लायन मल्लिकार्जुन मसुती यांनी आपल्या मनोगतात अध्यक्ष, सचिव, खजिनदार आणि संचालक मंडळास पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिले.तसेच यावेळी सीए.अमॄता चारहजारी व, सीए. सचिन हबीब शाल, मोत्याचा हार, बुके मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आला.नुतन अध्यक्ष लायन मोहन भुमकर यांनी मान्यवरांना भेट वस्तू प्रदान करून आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले.
यावेळी सोलापूर लायन परिवारातील इतर क्लबचे अध्यक्ष, सचिव, खजिनदार, कॅबिनेट ऑफीसर यांची ओठउपस्थिती होती. शेवटी आभार प्रदर्शन सचिव लायन राहुल भुमकर यांनी केले.कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली.