पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
धोंडेवाडी येथे रत्नाई कृषी महाविद्यालय अकलूजच्या कृषीदूत विद्यार्थ्यांनी केळी फळाची वैज्ञानिक पद्धतीने पॅकिंग कसे करावे याचे प्रात्यक्षिक घेतले. या प्रात्यक्षिकामध्ये शेतकऱ्यांना केळीची प्रत व टिकाऊपणा टिकवून ठेवण्यासाठी योग्य पॅकिंग साहित्य, पद्धती, आणि प्रक्रिया यांची माहिती दिली.
प्रात्यक्षिकामध्ये केळीची वर्गवारी, धुणे, साफसफाई, योग्य आकारानुसार पॅकिंग, कागदाचा वापर, पुठ्ठा बॉक्समध्ये भरती, आणि वाहतुकीसाठी काळजी या सर्व टप्प्यांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी कृषीदूतांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या प्रश्नांना उत्तर दिली आणि केळी निर्यातीसाठी आवश्यक पॅकिंग प्रक्रिया का गरजेची आहे, याचे महत्त्व पटवून दिले. शेतकऱ्यांनी या उपक्रमाचे कौतुक करत भविष्यातही अशा उपयुक्त मार्गदर्शनाची मागणी केली.
या वेळी कृषीदूत: क्षिरसागर मंगेश, डोंगरे रामहरी, खरात रोहन, खटके रणजित, माळी शंतनु, राऊत चैतन्य, शिंदे आविष्कार उपस्थित होते.या कार्यक्रमासाठी रत्नाई कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य आर जी नलावडे तसेच प्रा. एस एम एकतपुरे (कार्यक्रम समन्वयक) प्रा. एम एम चंदनकर (कार्यक्रम अधिकारी) विषयतज्ञ प्रा. एच.वी.खराडे यांचे मार्गदर्शन लाभले.