पंढरपूर प्रतिनिधी नंदकुमार देशपांडे तेज न्यूज
पंढरपूर शहरातील गजबजलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातून विठ्ठल मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर गोपाळ कृष्ण मंदिरासमोर हात गाडीवाले फेरीवाले यांनी बिनधास्तपणे आपला व्यवसाय सुरू केला आहे .
रस्त्याच्या मधोमधच वाहनधारकांना व पादचाऱ्यांना भाविकांना यांचा अडथळा होत आहे .वास्तविक पाहता पंढरपूर नगर परिषदेच्या अतिक्रमण विभागाने यावर कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याचे सोडून वरवर मलमपट्टी केली जाते आहे .तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडून विठ्ठल मंदिराकडे बाहेर गावावरून दर्शनासाठी येणारे वाहनधारक ही आपली वाहने थेट गोपाळ कृष्ण मंदिराकडे घेऊन आल्याने या ठिकाणी वारकऱ्यांना भाविकांना नागरिकांना नेहमीच गर्दीचा सामना करावा लागतो याकडे वाहतूक पोलिसांचेही दुर्लक्ष असून ज्या ठिकाणी कारवाई करायची त्या ठिकाणी कारवाई होत नाही हे मात्र सर्वांचे दुर्दैव आहे.
सकाळी सहा वाजल्यापासून या फेरीवाल्यांचा वावर छत्रपती शिवाजी महाराज चौक ते गोपाळ कृष्ण मंदिरा परिसरात चाललेला असतो. मंदिर समितीचे कर्मचारी पोलीस व रक्षक नेमलेले आहेत यांचे नेमके काय काम आहे ते समजत नाही.परमात्मा विठ्ठल जाणो कारण चौफुळ्यामध्ये गर्दीला हटवण्याचे साधे कष्टही हे घेत नसताना दिसून येतात त्यामुळे या रस्त्यावर नेहमीच येणाऱ्या जाणाऱ्यांना अडथळ्यातून जावे लागते.
चौफळा परिसरात हात गाड्यावर ज्या खेळण्यातील बंदुका विक्री करणारे व्यापारी आहेत. त्या बंदुकीमध्ये गुलाल अर्थात गंधक मिश्रित काड्याच्या पेटीतील काडी त्या बंदुकीत घातल्यानंतर ट्रिगर दाबल्यानंतर त्याचा आवाज होतो त्यातून बाहेर पडणाऱ्या गंधकाच्या धुरामुळे वारकरी भाविक नागरिक लहान मुले यांना धपकारा बसल्याने त्याच्या वासाने त्रास जाणवतो असे अनेकांचे म्हणणे आहे त्यामुळे या प्रकारला तातडीने आळा घालावा अशी नागरिकांतून मागणी आहे.
तसेच बंदूक विकणाऱ्या व्यापाऱ्यांना इतर ठिकाणी जागा उपलब्ध करून देण्यात यावी . जेणेकरून त्याचा त्रास कोणाला होणार नाही.