जैनवाडी प्रतिनिधी तेज न्यूज
जैनवाडी (ता. पंढरपूर) येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्नित अकलूज येथील रत्नाई कृषी महाविद्यालयाच्या ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषी दुतांकडून व जैनवाडी ग्रामपंचायत अंतर्गत कृषी दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमापूजन व प्रतिकात्मक वृक्ष देऊन सर्व मान्यवर व शेतकरी बांधवांना सन्मानित करण्यात आले. गावामध्ये विद्यार्थ्यांनी वातावरण बदल त्याचा शेतीवर होणारा परिणाम यामध्ये असणारे झाडांचे महत्त्व याबद्दल समाज प्रबोधन केले.
जैनवाडी या शाळेतील विद्यार्थ्यांकडून कृषी मित्रांच्या सहकार्याने गावामध्ये वृक्षदिंडी काढत विद्यार्थ्यांनी झाडे लावा झाडे जगवा, वृक्षारोपण करूया आणि निसर्ग वाचवुया अशा घोषणा देण्यात आल्या यानंतर वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला.
यासाठी ग्रामपंचायत, वन विभाग यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमासाठी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील, प्राचार्य आर जी नलावडे ,प्रा. एस. एम. एकतपुरे( कार्यक्रम समन्वयक),प्रा. एम. एम. चंदनकर (कार्यक्रम अधिकारी) यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच कृषीदूत यशराज दळवे ,अमित जगदाळे, प्रथमेश करे ,प्रशिक साबळे ,सुयश साखरे , सोनू वाडे, संकल्प शिराळकर, ऋषिकेश गिराम ,ज्योतीराम ढवळे , विद्यार्थी पालक ग्रामस्थ उपस्थित होते.