अंबरनाथ प्रतिनिधी गुरुनाथ तिरपणकर तेज न्यूज
शालेय मुलींना आरोग्य विषयक मार्गदर्शन मिळणे ही आता काळाची गरज ठरलेली आहे.त्याच अनुषंगाने सहकर्म सामाजिक कल्याण फाउंडेशन, अंबरनाथ यांच्या वतीने१९जुलै२०२५रोजी भाऊसाहेब परांजपे विद्यालय,कानसई, अंबरनाथ पूर्व येथे विद्यार्थिनींसाठी एक महत्त्वाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमात इयत्ता सातवी ते नववीच्या विद्यार्थिनींना आरोग्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले, तसेच त्यांना मोफत सॅनिटरी नॅपकीन्सचे वाटत करण्यात आले.
याप्रसंगी डॉ.सौ.अरुण गणेश राठोड(एम.बी.बी.एस.,डी.जी.ओ.स्त्री रोग आणि प्रसुती तज्ञ) यांनी विद्यार्थिनींना आरोग्याविषयी सखोल माहिती दिली.तसेच कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेच्या आशा स्वयं सेविका संजीवनी पाटील यांनी मुलींची शारीरिक जडणघडण, आहार,पालकांची जबाबदारी, आरोग्य व स्वच्छता अशा विविधांगी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ॲंटी पायरसी सेल, मुंबईचे मुख्य तपासी अधिकारी रामजित उर्फ महादेव गुप्ता माजी कमांडींग ऑफीसर"ई"परिमंडळ बृहन्मुंबई, राष्ट्रपती पदक सन्मानित दिलीप शाहू नारकर, भाऊसाहेब परांजपे हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती नयना गुळीक,सहकर्म सामाजिक संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा सौ.शितल माणिक पाटील, उर्मिला कदम, राजकुमारी गुप्ता, रुपाली पाटील, शारदा पाटील, रेश्मा कदम, सीमा उपाध्याय,सुरेश कदम, श्रीकुमार नायर, तुकाराम पाटील, पत्रकार संपादक हरी आल्हाट आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट विद्यार्थिनींना मासिक पाळीच्या आरोग्याबद्दल(Menstrual hygiene) योग्य मार्गदर्शन करणे आणि त्यांना सॅनिटरी नॅपकीन्सची उपलब्धता सुनिश्चित करणे हे होते.यामुळे विद्यार्थिनींमध्ये आरोग्याबद्दल जागरुकता वाढविण्यास मदत झाली आणि त्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटले.अनेक विद्यार्थिनींनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला.सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माणिक पाटील ,जितू गुप्ता , मुख्याध्यापिका नयना गुळीक , शितल पाटील व इतर सर्वांनी अथक परिश्रम घेतले.