भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
धोंडेवाडी (ता. पंढरपूर) येथे रत्नाई कृषी महाविद्यालय, अकलूज अंतर्गत ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषिदुतांच्या वतीने शेतकऱ्यांसाठी 'बँक प्रस्ताव तयार करण्याच्या पद्धती' या विषयावर मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले.
या मध्ये शेतकऱ्यांना शेतीसाठी कर्ज घेण्यासाठी लागणाऱ्या दस्तऐवजांची माहिती, बँकेकडून अपेक्षित कागदपत्रांची पूर्तता, व्यवसायिक प्रकल्प अहवाल तयार करण्याची पद्धत, तसेच बँक कर्ज मंजुरी प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती देण्यात आली व घेतलेल्या कर्जाचे परतफेडीसाठी ची प्रक्रिया सांगण्यात आली. व घेतलेल्या कर्जाचे वेळेत परतफेड केल्यानंतर शासनाकडून मिळणाऱ्या सवलतींची माहिती देण्यात आली. तसेच शेतकऱ्यांनी सावकाराकडून कर्ज न घेता बँक मधून कर्ज घेण्याचे आव्हान केले.
कार्यक्रमामध्ये कृषिदुतांनी विविध योजनांची माहिती देत शेतकऱ्यांना आत्मनिर्भर होण्यासाठी आर्थिक पाठबळ मिळवण्याचे महत्त्व स्पष्ट केले. स्थानिक शेतकऱ्यांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.या वेळी कृषिदूत क्षिरसागर मंगेश, डोंगरे रामहरी, खरात रोहन, खटके रणजित, माळी शंतनु, राऊत चैतन्य, शिंदे आविष्कार आणि ग्रामस्थ यांनी उपस्थित होते,
या कार्यक्रमासाठी रत्नाई कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य आर जी नलावडे तसेच प्रा. एस एम एकतपुरे (कार्यक्रम समन्वय) प्रा. एम एम चंदनकर (कार्यक्रम अधिकारी) विषयतज्ञ प्रा एस. वी. तरंगे यांचे मार्गदर्शन लाभले.