इंदापूर प्रतिनिधी गणेश धनवडे
इंदापूर आगराने नव्याने सुरु केलेल्या बस चे स्वागत विश्वासराव रणसिंग महाविद्यालय कळंब ता. इंदापुर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विजय केसकर व उपप्राचार्य ज्ञानेश्वर गुळीग यांनी केले.बस चे चालक नामदेव फड वाहक पुनम ठोसरे,वाहक दिपक खडे यांचा सन्मान महाविद्यालय प्राचार्य व उपप्राचार्य यांच्या हस्ते करण्यात आला. ग्रामीण भागातील विद्यार्थी ,नोकरदार यांना या नव्याने सुरु झालेल्या बस चा फायदा होणार आहे.
इंदापूर आगारातून सकाळी ७ :३० वा. सुटणारी गाडी वकील वस्ती -भोंडणी-शहाजी नगर- रेडा-सराफवाडी- घोरपवाडी- निमसाखर-कंळब - वालचंदनगर या मार्गावर एसटी बस सेवा सुरू राहणार आहे. ही गाडी वालचंदनगर येथून दुपारी ३ : ४५ वा. सुटून याच मार्गे इंदापूरला जाणार आहे.
तालुक्यातील या आडमार्गाने इंदापूर व वालचंदनगर या ठिकाणी जाण्यासाठी स्थानिक गावातील विद्यार्थी व नागरिकांना बस हेच प्रवासाचे साधन असल्यामुळे नव्याने सुरु झालेल्या बसमुळे प्रवासाची सोय झाल्याचे विश्वासराव रणसिंग महाविद्यालयीन विद्यार्थी यांनी सांगितले.
प्राचार्य डॉ. विजय केसकर यांनी महाविद्यालयात घोरपडवाडी ,निमसाखर,सराफवाडी इ भागातून विद्यार्थी शिक्षणासाठी महाविद्यालयात येतात या मार्गावर एस टी बस सुविधा नसल्यामुळे अनेक विद्यार्थीना दररोज महाविद्यालयात उपस्थित राहण्यासाठी अडचणीचा सामना करावा लागत होता परंतु या मार्गावर बस सुविधा सुरु झाल्यामुळे विद्यार्थीच्या नियमित उपस्थिती राहील असे सांगितले.
बस चे स्वागत करतेवेळी महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. प्रशांत शिंदे ,प्राध्यापक डॉ.रामचंद्र पाखरे,प्रा.डॉ.विलास बुवा,प्रा. राजेंद्रकुमार डांगे, प्रा. ज्योत्स्ना गायकवाड,प्रा.तेजश्री कोकाटे ,प्रा. अभिजीत शिंगाडे ,प्रा. सुवर्णा बनसोडे,प्रा.धुळदेव वाघमोडे,प्रा.योगेश खरात इ मान्यवर व प्राध्यापकेत्तर कर्मचारी ,विद्यार्थी उपस्थित होते.