भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर तालुक्यातील जैनवाडी येथे ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत रत्नाई कृषी महाविद्यालय अकलूज येथील कृषी दूताने कृषी संरक्षण किट बाबत माहिती दिली.
या कार्यक्रमात कृषी मित्रांनी शेतकऱ्यांना संरक्षण कीटकापासून होणारे फायदे सांगितले तसेच किट न वापरल्यामुळे होणाऱ्या हानी विषयी माहिती सांगितली तसेच किट वापरण्याचे आवाहन ही केले.
यावेळी गावातील ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी कृषी मित्र यशराज दळवे ,अमित जगदाळे, प्रथमेश करे, प्रशिक साबळे, सुयश साखरे ,सोनू वाडे संकल्प शिराळकर, ऋषिकेश गिराम ,ज्योतीराम ढवळे, यांनी माहिती दिली या कार्यक्रमासाठी रत्नाई कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य आर जी नलावडे तसेच प्रा. एस. एम एकतपुरे( कार्यक्रम समन्वयक) प्रा .एम .एम चंदनकर (कार्यक्रम अधिकारी )विषय तज्ञ प्रा .डी .पी बरकडे यांचे मार्गदर्शन लाभले.