मुंबई प्रतिनिधी तेज न्यूज
महाराष्ट्रातील पालक आणि विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, ही आहेत कारणं
महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्यातील सर्वच शाळांना येत्या 8 आणि 9 जुलै 2025 रोजी दोन दिवसांची सुट्टी मिळणार आहे. ही सुट्टी अचानक मिळालेली नसून यामागे एक मोठं आणि दीर्घकालीन कारण दडलेलं आहे. राज्य सरकारच्या विरोधात पुकारण्यात आलेलं शाळा बंद आंदोलन हे या दोन दिवसांच्या सुट्टीमागचं मुख्य कारण आहे (Maharashtra school holidays). या आंदोलनाला महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळ, संयुक्त मुख्याध्यापक महामंडळ, तसेच राज्यातील विविध शिक्षक संघटनांनी बिनशर्त पाठिंबा दिला आहे. त्यामुळे हे आंदोलन अधिक व्यापक आणि प्रभावी ठरण्याची शक्यता आहे.
खरंतर राज्यातील अनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांमधील शिक्षक आणि कर्मचारी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरणार आहेत. त्यामुळे 8 आणि 9 जुलै रोजी राज्यातील हजारो शिक्षक मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन करणार आहेत (July 8 9 school close). याच कारणांमुळे शाळा बंद असणार आहेत.