पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मधील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील चतुर्थ वर्षात शिक्षण घेत असतानाच कुमारी वृषाली नवनाथ वाघमारे व मयुरेश अतुल मम्हाणे यांची कॅम्पस प्लेसमेंट मधुन वरली कंपनीत निवड झाली असल्याची माहिती मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डॉ. श्याम कुलकर्णी यांनी दिली.
बाभुळगाव (ता.पंढरपूर) येथील कुमारी वृषाली नवनाथ वाघमारे व हनुमान नगर, पंढरपूर येथील मयुरेश अतुल मम्हाणे यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत असतानाच वरली प्राइवेट लिमिटेड (वार्षिक पॅकेज 5.83 लाख) या कंपनीमध्ये निवड झााली असून सप्टेंबर 2025 मध्ये पुणे येथे रुजू होणार आहे.
मुंबई येथील वरली ही कंपनी ग्राहकांना ऊर्जा, रसायने आणि संसाधने तसेच समाजाला आवश्यक असलेली उपलब्धता प्रदान करते. सन 1962 पासून भारतामध्ये ही कंपनी कार्यरत असून 6000 पेक्षा जास्त इंजिनियर भारतातील वेगवेगळया ८ कार्यालयामध्ये काम करीत आहे. पंढरपूर सिंहगड महाविदयालय हे प्रथम वर्षापासून विदयार्थ्यांना कॅम्पस प्लेसमेंटच्या तयारीचे प्रशिक्षण देत असते. प्रत्येक सत्रामध्ये विदयार्थ्यांना कौशल्य विकसीत करण्यासाठी वेगवेगळया स्पर्धेचे आयोजन करत असते. सर्व विभाग विदयार्थ्यांसाठी व्हॅल्यू ॲडीशन प्रोग्रॅम, वक्तृत्व स्पर्धा, रिझयूम कॉम्पीटिशन, व्हर्च्यूअल कॅम्पस, ग्रूप डिक्सशन, प्रोजेक्ट कॉम्पीटिशन, कोडींग कॉम्पीटिशन इ.ॲक्टीव्हिटी वारंवार घेत असतात. त्यामुळे विदयार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी मदत होते.
कुमारी वृषाली वाघमारे व मयुरेश मम्हाणे यांची कॅम्पस मुलाखतीतून निवड झाल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, डॉ. चेतन पिसे, डॉ. भालचंद्र गोडबोले, डॉ. श्याम कुलकर्णी, डॉ. श्रीगणेश कदम, डॉ. संपत देशमुख, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. अतुल आराध्ये, डॉ. दिपक गानमोटे, डॉ. सोमनाथ कोळी, डॉ. सुभाष पिंगळे, डॉ.अनिल निकम, डॉ. शिवशंकर कोंडूरु, डॉ. यशवंत पवार, डॉ. सत्यवान जगदाळे, प्रा. अभिजित सवासे, प्रा. अतुल कुलकर्णी आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.